S M L

राजीव गांधींच्या मारेकऱ्यानं केला दयामरणाचा अर्ज

रॉबर्ट पायसनं आता तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मला दयामरण द्यावं अशी मागणी केलीय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 22, 2017 04:03 PM IST

राजीव गांधींच्या मारेकऱ्यानं केला दयामरणाचा अर्ज

22 जून : 26 वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान राजीव गांधींची हत्या झाली होती. या हत्याकांडातले 7 आरोपी आजही कारावास भोगतायत. त्यातीलच एक रॉबर्ट पायसनं आता तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मला दयामरण द्यावं अशी मागणी केलीयं.

रॉबर्टनं राजीव गांधीच्या खुनाच्या कटात एक मुख्य भूमिका बजावली होती .हत्येच्या काही दिवस आधी चेन्नईत येऊन त्यानं गस्त घातली होती. तसंच खुनाचे प्लॅनिंग करणाऱ्या शिवाकरणचा तो अत्यंत जवळचा सहकारी होता. त्यानं कटात सामील असल्याची कबुलीही दिली होती.

रॉबर्टसोबत 6 जणांना फाशीची शिक्षा सुनवण्यात आली होती. त्यांचा दयेचा अर्ज फेटाळायला राष्ट्रपतींनी 11 वर्ष लावली होती . दयेचा अर्ज फेटाळायला 11 वर्ष लावली या धर्तीवर सुप्रीम कोर्टानं त्यांच्या फाशीच्या शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेच्या शिक्षेत केलं .हे व्हायला 2014 साल उगवलं. तोपर्यंत 23 वर्ष दोषींनी कैदेत काढले होते. जन्मठेप ही साधारण 14-20 वर्षांची असते .म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री जयललितानी त्यांना सोडण्याचे आदेश दिले होते .या निर्णयाचे तामिळनाडूतल्या सर्व पक्षांनी स्वागत केलं होतं. अगदी करूणानिधींनीसुद्धा त्याची तारीफ केली होती. पण केंद्रानं तसं होऊ दिलं नाही .अजूनही त्याची सुटका झालेली नाही.युपीए आणि एनडीए दोन्ही सरकारांनी त्याची निराशा केलीय. 'माझ्या जगण्याला काही अर्थ उरलेला नाही. कैदेत जगण्यापेक्षा मेलेले बरे ,म्हणून मला मरू द्या' असं त्याने पत्रात लिहिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2017 04:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close