वयाच्या अशा उंबरठ्यावर आहे ही प्रौढ व्यक्ती; कोरोना लस मिळणं झालं मुश्किल

कोरोनाला हलक्यात घेऊ नका. कोरोना संक्रमण कोणालाही होऊ शकतो. कोरोना पासून वाचण्यासाठी सगळे नियम पाळा. आता सरकारने 18 वर्षांवरील मुलांसाठी लसीकरणाला परवानगी दिली आहे. पण लहान मुलांसाठी अद्याप व्हॅक्सिनेशन उपलब्ध नाही.

18 पेक्षा कमी वय नाही पण, ना ही व्यक्ती 18+ कॅटेगिरीत बसत ना 45+ कॅटेगिरीत.

  • Share this:
    दिसपूर, 12 जून : सध्या 18+ सर्व प्रौढ नागरिकांना कोरोना लस (Corona vaccine) दिली जाते आहे. 18 ते 44 आणि 45+ असे दोन गट करण्यात आले आहेत. पण एका व्यक्तीच वय 18 पेक्षा लहान नाही पण 18+ आणि 45+ या दोन्ही कॅटेगिरीत ती बसत नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे या व्यक्तीला कोरोना लस मिळण्यात मोठी अडचण झाली (Mans age becomes hurdle in getting corona vaccine). आसाममध्ये (Assam) राहणारा दिगांता कुर्मी. खुमताई टी इस्टेटमध्ये एक चहा कर्मचारी आहे. त्याच्या वयाचा आकडा कोरोना काळात त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. कोरोना लस मिळण्यात त्याला या वयाच्या आकड्यामुळे अडचण निर्माण झाली (Man not getting corona vaccine because of his age). दिगांता 10 जूनला टी गार्डन हॉस्पिटलमध्ये कोरोना लशीचा पहिला डोस घेण्यासाठी गेला. कोरोना लशीचा पहिला डोस घेण्यासाठी जाण्याची त्याची ही दुसरी वेळ होती. याआधी तो गोलाघाट जिल्ह्यातील कुमताई मॉडेल हॉस्पिटलमध्ये गेलो होता. पण तिथं त्याला कोरोना लशीचा पहिला डोस मिळाला नाही आणि याचं कारण म्हणजे त्याचं वय. हे वाचा - लहान मुलांसाठी आता खास Corona vaccine तयार; सप्टेंबरमध्येच होणार लाँच आधार कार्डनुसार दिगांताचं वय 44 वर्षे 7 महिने आहे. त्यामुळे तो 45+ आणि 18 ते 44 दोन्ही कॅटेगिरीत बसत नसल्याचं त्याला सांगण्यात आलं. सिस्टम त्याची माहिती घेत नसल्याचं काऱण त्याला देण्यात आलं. दिगांता म्हणाला, "मला  45+ कोरोना लसीकरणात लशीचा पहिला डोस नाही मिळाला कारण मी 44 वर्षे 7 महिन्यांचा आहे. तर 18-44 वयोगटाच्या कॅटेगिरीत मी बसत नाही, सिस्टममध्ये माहिती अपलोड होत नाही, असं त्यांनी सांगितलं. मला दोन मुलं आहे. जर मी लस घेतली नाही तर मला कोरोनाचा धोका आहे. माझं वय ही माझी चूक नाही. खुमताई टी इस्टेटमधील कर्मचारी आनंद चेतीया यांनी सांगिलं, "आधार कार्डनुसार 44 पेक्षा जास्त वय असल्याने कुर्मीला कोरोना लस दिली नाही. सिस्टम त्याचं वय ग्राह्य धरत नाही आहे, आम्ही काहीच करू शकत नाही, असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. 44 ते 45 वयोगटातील लोकांचं कसं होणार" हे वाचा - Coronaउपचारबाबत एप्रिल-मेमध्ये Facebook,Twitterने पोहोचवली दिशाभूल करणारी माहिती ही बाब राष्ट्रीय आरोग्य मिशन अधिकारी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्याची तात्काळ दखल घेण्यात आली. त्यानंतर लगेच दिगांताला फोन आला आणि त्यानंतर कोरोना लस मिळणार हे पक्कं झालं, त्याच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला. आसामच्या चहा बागांचा परिसर जिथं साक्षरता आणि डिजिटल ज्ञानाचा अभाव आहे, तिथं आता राज्य सरकारने चहा बाग कामगारांसाठी बंधनकारक नोंदणीचा निर्णय रद्द केला आहे. अधिकाऱ्यांमार्फत कामगारांसाठी लसीकरण राबवलं जातं आहे.
    Published by:Priya Lad
    First published: