पाहा PHOTO : पुरामुळे थकल्याभागल्या वाघाने जवळच्या घरात घेतला आसरा, बिछान्यावर दिलं झोकून

आसाममधल्या पुरामुळे काझीरंगा अभयारण्यातले प्राणी आणि या जंगलाजवळ राहणाऱ्या माणसांचा जगण्यासाठी आटापिटा सुरू आहे. या पुरामध्ये जीव वाचवण्यासाठी जंगलाबाहेर आलेल्या एका दमलेल्या वाघाची आणि एकशिंगी गेंडे, हत्ती आणि माणसांची ही कहाणी...

  • Share this:

आसाममध्ये आलेल्या पुरामुळे काझीरंगा अभयारण्यातल्या प्राण्यांवर जलसंकट आलं आहे. या भीषण पुरातून वाचलेल्या एका थकल्याभागल्या वाघाने एका दुकानदाराच्या छोट्याशा घरात आसरा घेतला. तिथे टाकलेल्या एका उबदार अंथरुणात त्याने स्वत:ला झोकून दिलं.

पुरामुळे थकलेल्या या वाघाला अशी विश्रांती हवीच होती. ज्या मोतीलालचं हे घर होतं तो आधी वाघाला बघून चांगलाच घाबरला होता. पण या वाघाने त्याच्याकडे नुसतं बघितलं आणि शांतपणे घरात जाऊन आसरा घेतला. दहा तासांनंतर या वाघाला पुन्हा एकदा जंगलात जाण्यासाठी वाट करून देण्यात आली.

ज्या घरामध्ये या वाघाने आसरा घेतला त्या घराजवळच्या भागाला वनाधिकाऱ्यांनी वेढा घातला आणि वाघाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. नंतर या वाघाला जंगलात जाण्यासाठी मार्ग करून देण्यात आला.

काझीरंगामधले एकशिंगी गेंडे आणि बाकीचे वन्यप्राणीही पुरापासून बचाव करण्यासाठी उंचावरच्या ठिकाणी गेले आहेत.

काझीरंगा नॅशनल पार्कजवळ राहणाऱ्या गावकऱ्यांनाही पुराच्या पाण्यातून अशा बोटींमधून ये जा करावी लागते आहे.

Loading...

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे दरवर्षीच असा पूर येतो आणि एकशिंगी गेंड्यांना स्वत:चा बचाव करण्यासाठी खटाटोप करावा लागतो.

 एकशिंगी गेंडे पुराच्या लोंढ्यातून पोहतपोहत वाट काढत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 07:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...