आसाममध्ये पुरामुळे मृतांची संख्या वाढली, 23 जिल्ह्यांमध्ये 25 लाख लोकांना फटका

आसाममध्ये पुरामुळे मृतांची संख्या वाढली, 23 जिल्ह्यांमध्ये 25 लाख लोकांना फटका

कोकराझारमधील कचूगावमध्ये दोन आणि मोरीगाव जिल्ह्यातील भूरागाव इथं एकाचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

आसाम, 26 जुलै : आसाममधील पूर परिस्थिती सध्या आपत्तीजनक आहे आणि राज्यातील 33 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांमध्ये सुमारे 25 लाख लोक प्रभावित झाले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) जारी केलेल्या बुलेटिननुसार बार्पेटा इथल्या कलागाछिया इथे दोन, कोकराझारमधील कचूगावमध्ये दोन आणि मोरीगाव जिल्ह्यातील भूरागाव इथं एकाचा मृत्यू झाला आहे.

एएसडीएमएने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मे महिन्यापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरात लोकांचे मृत्यू तर झालेच आहे पण 26 जण भूस्खलनात बळी पडले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच रविवारी प्रसिद्ध झालेल्या बुलेटिननुसार राज्यातील 33 जिल्ह्यांपैकी 26 जिल्ह्यांमधील 2265 गावांमध्ये सुमारे 25 लाख लोक अजूनही पुराचा फटका सहन करत आहेत.

कारगिल विजय दिवशीच महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण, काश्मीर खोऱ्यात गमावला प्राण

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त तरुणाने दिला संदेश, सगळ्यांनी दिल्या शुभेच्छा

पुराच्या फटक्यामुळे गोलपाडा भागात मोठा परिणाम झाला आहे. इथे 4.7 लाख लोकांना पुराचा मारा बसला आहे. यानंतर बारपेटामध्ये 3.95 लाख आणि मोरीगांवामध्ये 3.33 लाख लोक पुराचा धोका सहन करत आहेत. एएसडीएमएने दिलेल्या बुलेटिननुसार, पुरामुळे जब्बल 16 जिल्हे प्रभावित झाले आहे आणि यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 457 मदत शिबिरं आणि वितरण केंद्रे चालवली जात आहेत. यामध्ये 46,000 लोकांनी आश्रय घेतला आहे. पुराच्या माऱ्यामुळे 1.12 लाख हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 26, 2020, 8:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या