गुवाहाटी, ता.10 ऑक्टोबर : समर्थकांनी हत्तीवरून काढलेली मिरवणूक आसाम विधानसभेच्या उपसभापतींना चांगलीच अंगलट आलीय. मिरवणुकीत हत्ती बिथरल्याने उपसभापती खाली कोसळले. सुदैवानं त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. ही घटना घडलीय आसामच्या करीमगंज जिल्ह्यात.
भाजपचे आमदार कृपानाथ मल्ला यांची विधानसभेच्या उपसभापती निवड झाली. आपल्या नेत्याची मोठ्या पदावर निवड झाल्याने मल्ला यांच्या समर्थकांनी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. मल्ला हे रातबारी या विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. रातबारीच्या भाजप कार्यकर्त्यांनी मिरवणुकीसाठी हत्तीला सजवून त्यावर मल्ला बसले आणि मिरवणूक सुरू झाली.
गर्दी आणि घोषणांमुळं हत्ती बिथरला. माहुताला तो ताब्यात ठेवणं शक्य होत नव्हतं. हत्ती वेगानं धावायला लागला आणि उपसभापती कृपानाथ मल्ला हत्तीवरून खाली कोसळले. मल्ला यांच्या समर्थकांनी त्यांना लगेच उचललं. सुदैवानं त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
#WATCH: Newly-elected deputy speaker of Assam assembly Kripanath Mallah falls off an elephant. He was being welcomed by his supporters in
— ANI (@ANI) October 8, 2018
Ratabari, his own constituency, in Karimganj district. The deputy speaker was unhurt in the incident. (06.10.2018) #Assam pic.twitter.com/2UYHkS7zvx