मुंबईतल्या 'या' स्ट्रगलिंग अभिनेत्रीने केली आत्महत्या, इमारतीच्या टेरेसवरून मारली उडी!

काल रात्री केन वुड नावाच्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून तिने आपलं आयुष्य संपवलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 05:47 PM IST

मुंबईतल्या 'या' स्ट्रगलिंग अभिनेत्रीने केली आत्महत्या, इमारतीच्या टेरेसवरून मारली उडी!

मुंबईच्या पॉश अशा ओशिवारा लोखंडवाला भागात 22 ते 25 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली आहे. काल रात्री केन वुड नावाच्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून तिने आपलं आयुष्य संपवलं.

पर्ल पंजाबी असं मृत तरुणीचं नाव आहे. माहितीनुसार पर्लला सिनेसृष्टीची प्रचंड आवड होती. ती बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीमध्ये जागा मिळवण्याच्या प्रयत्नात होती. पण, त्यात तिला यश मिळू शकलं नाही. सध्या ती एका ठिकाणी नोकरी करत होती.

मृत पर्ल आणि तिच्या आईमध्ये सतत वाद होत असायचे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पर्लची मानसिक स्थितीही ठीक नव्हती. तिच्या शरीरात एक आत्मा आहे आणि म्हणून ती सतत रागात असायची. ती स्वत: वर नियंत्रण ठेवू शकत नव्हती आणि नेहमी विचित्र वागायची अशी माहिती पोलिसांना स्थानिकांनी दिली.

यापूर्वीही मृत पर्लने 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु, ती वेळेत वाचली. रात्री साडे बाराच्या दरम्यान घरात काही वाद झाला आणि रागात तिने मानसिक संतुलन गमावलं.

त्यानंतर पर्लने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली. खरंतर टेरेसवर इमारतीचा सुरक्षारक्षक राहतो. पण तो काही कामासाठी खाली गेला होता. आणि त्यामुळे त्याने टेरेसचा दरवाजा उघडा ठेवला. तो जेव्हा खाली आला तेव्हा त्याने पर्लला गंभीर जखमी अवस्थेत पडलेलं पाहिलं.

Loading...

सगळ्यांना घटनेची माहिती मिळताच पर्लला तात्काळ कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत तिच्या मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस आता संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 30, 2019 05:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...