कामाचे पैसे मागितले, ठेकदाराने मजुराला पेट्रोल टाकून पेटवले

कामाचे पैसे मागितले, ठेकदाराने मजुराला पेट्रोल टाकून पेटवले

कामाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने ठेकेदाराने एका मजुराला पेट्रोल ओतून पेटवल्याची धक्कादायक घडना पिंपरी चिंचवडमध्ये घडली

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 20 फेब्रुवारी : कामाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने ठेकेदाराने एका मजुराला पेट्रोल ओतून पेटवल्याची धक्कादायक घडना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेत सुभाष  साह हा मजूर गंभीररीत्या भाजला असून  अत्यावस्थ आहे. या प्रकरणी ठेकेदार  मोहम्मद अन्वर झुमरातिया आणि त्याचा साथीदार  संतोषकुमार हरकराम  विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद हा ठेकेदार असून फिर्यादी सुभाष हे त्याच्याकडे कामाला होते. जानेवारी महिन्यात सुभाष यांनी मोहम्मद यांच्याकडे कामाचे पैसे मागितले. मात्र, पैसे देण्यास मोहम्मद याने नकार दिला. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी सुभाष यांनी पुन्हा पैशाची मागणी केली. त्यामुळे चिडलेल्या मोहम्मद याने आरोपी संतोषकुमार याच्या मदतीने सुभाष यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. तसंच, याबाबत कोठेही वाच्यता केल्यास इंन्जेक्शन देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत  सुभाष गंभीररीत्या भाजले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

पेट्रोल पंपावर तरुणाने महिला कर्मचाऱ्या कानशिलात लगावली, धक्कादायक VIDEO

दरम्यान, उल्हासनगरमध्ये  पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणाने पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये समोर आली आहे. पेट्रोल भरत असताना मोबाईल बंद करण्यासाठी सांगितल्याचा राग आल्याने महिला कर्मचारीला मारहाण करण्यात आली आहे.

हा सगळा प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बुधवारी रात्री ९च्या सुमारास विठ्ठलवाडी भागातील भारत पेट्रोल पंपावर एक तरुण पेट्रोल भरण्यासाठी आला होता. मात्र, पेट्रोल भरत असताना  तो मोबाईलवर बोलत  होता. त्यावेळी फोन बंद करण्यासाठी महिला कर्मचाऱ्याने त्याला सांगितलं. परंतु, या तरुणाने त्याकडे दुर्लक्ष केलं. पुन्हा एकदा या महिलेनं त्याला सांगितले असता या तरुणाला राग अनावर झाला. पेट्रोल भरून झाल्यावर तो पुन्हा मागे आला आणि या महिलेच्या अंगावर धावून गेला. शिवीगाळ करत या महिलेला मारहाण केली.

पेट्रोल पंपावरच तरुण आणि महिला कर्मचाऱ्यामध्ये झटापट सुरू असल्यामुळे इतर कर्मचारी मदतीसाठी धावून आले. अखेर या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: February 20, 2020, 10:14 PM IST

ताज्या बातम्या