300 किलोहून डायरेक्ट 86 किलोवर, पाहा आशिया खंडातील सर्वात लठ्ठ महिलेचे PHOTOS

300 किलोहून डायरेक्ट 86 किलोवर, पाहा आशिया खंडातील सर्वात लठ्ठ महिलेचे PHOTOS

5 वर्षांपूर्वी 300 किलो पेक्षा जास्त वजन वाढलेल्या अमिताचे बेरिएट्रिक शस्त्रक्रियेच्या मदतीने वजन कमी करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 08 मे : आशिया खंडातील सर्वात लट्ठ महिला म्हणून ओळख असलेल्या मुंबईच्या अमिता राजानी या महिलेनं चक्क 214 किलो वजन कमी केलं आहे. 5 वर्षांपूर्वी 300 किलो पेक्षा जास्त वजन वाढलेल्या अमिताचे बेरिएट्रिक शस्त्रक्रियेच्या मदतीने वजन कमी करण्यात आलं आहे.

सध्या 42 वर्षीय असलेल्या अमिता राजानी स्टॉक एक्सचेंजचं काम करते. एकेकाळी जास्त वजनदार शरीरामुळे तिला चालणं, उठणं, पायऱ्या उतरणं इतकंच काय तर जेवण करणं आणि टॉयलेटला जाणं इतक्या रोजच्या दिनचर्येच्या गोष्टीसाठी देखील अमिता तिच्या कुटुंबियांवर अवलंबुन होती. पण आता तिचं वजन कमी झाल्यामुळे तिच्या आयुष्याला एक नवं वळण लागलं असंच म्हणावं लागेल.स्वप्नातदेखील आशा-अपेक्षा सोडून बसलेल्या अमिताचे वजन 86 किलो झाले आहे. त्यामुळे अमिता जवळपास तिच्या सर्वच कामात स्वावलंबी झाली आहे. आयुष्याच्या या सगळ्यात मोठ्या संकटावर नात करण्यासाठी मदत केलेल्या डॉक्टरांचं तिने आभार मानले आहेत. अमिताला तिचं पुढचं आयुष्य सुखाने जाओ अशा न्यूज 18 लोकमतच्या शुभेच्छा.हेही वाचा : मातृत्वाला कलंक! अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या मुलाला आईनेच संपवलं

जगातल्या सगळ्यात लठ्ठ महिलेचा मृत्यू

एके काळी जगातली सगळ्यात लठ्ठ महिला असलेल्या इमान अहमदचा मृत्यू झाला. इमानच वजन 500 किलो होतं. अबु धाबीत वजन कमी करण्यासाठी तिच्यावर उपचार चालू होते.

इमानला इतिप्तहुन बुर्जील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिच्या उपचारासाठी 20 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज होती. हॉस्पिटलचे सीईओ डॉ. यासीन एल शाहत यांनी सांगितलं की, "इमान उपचाराच्या दुसऱ्या स्टेजमध्ये जेवण करत होती आणि व्हिलचेअरचाही ती वापर करत होते. मात्र, तब्येत खालवल्यामुळे आम्ही तिला वाचवू शकलो नाही."

याआधी इमान अहमदने फेब्रुवारीमध्ये मुंबईतील सैफी हॉस्पिटमध्ये कमी करण्याची शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेआधी तिचं वजन 504 किलो इतकं होतं. मुंबईत तब्बल 4 महिने तिच्यावर उपचार सुरू होते. या दरम्यान इमानचं वजन 300 किलो पर्यंत कमी झालं होतं. अशा दावा सैफी हॉस्पिटलने केला होता. पण, वजन कमी झालंच नाही असा दावा तिच्या बहिणीने केला होता.


VIDEO: धारदार शस्त्रांनी घरफोडी, थरकाप उडवणारी घटना CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 08:11 PM IST

ताज्या बातम्या