Asian Games 2018 : महाराष्ट्राची कन्या राही सरनोबतने पटकावले सुवर्णपदक

Asian Games 2018 : महाराष्ट्राची कन्या राही सरनोबतने पटकावले सुवर्णपदक

  • Share this:

जकार्ता, 22 आॅगस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या कोल्हापूरची कन्या राही सरनोबत सुवर्णपदक पटकावले आहे. 25 मीटर एअर पिस्टल प्रकार राहीने सुवर्ण'भेद' केलाय. राहीने फायनलमध्ये जबरदस्त कामगिरी करत भारताला 11 वे पदक आणि चौथे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या प्रकारात सर्वांची नजर ही मनु भाकरवर होती पण राहीने सुवर्णपदक पटकावले.

जकार्ता आणि पालेमबांगमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आहे. टेनिसमध्ये अंकिता रैनाने क्वॉर्टर फायनलमध्ये हाँगकाँगच्या चोंग उडीस वोंग हिला सरळ सेटमध्ये 6-4, 6-1 असे पराभूत केले. यामुळे महिला एकेरी सेमीफायनलमध्ये स्थान मिळाले आहे. तसंच, तिला ब्रॉन्ज पदक निश्चित आहे.

भारताच्या पारड्यात सध्या 11 पदके आहेत. भारताकडे आतापर्यंत 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कास्य पदकांची कमाई झाली आहे. भारताच्या हॉकी टीमने एक नवा विश्व विक्रम आपल्या नावे केलाय. टीमने तब्बल 26 गोल करत फानलमध्ये धडक मारलीय.

भारताच्या Artistic महिला टिमने फायनलमध्ये धडक मारलीये. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचणारी ही पहिली टीम ठरलेय. संध्याकाळी 4.30 वाजता हा सामना रंगणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी  नेमबाजपटू लक्ष्य शेरॉन याने सुरेख कामगिरी करताना पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात रौप्यपदक मिळवले. अवघ्या २०व्या वर्षी आशियाई रौप्यपदक जिंकण्याची किमया साधणाऱ्या लक्ष्यने माजी नेमबाजपटू मानवजीत सिंग संधूच्या विक्रमाची बरोबरी केली. १० मी. एअर रायफल प्रकारात भारताच्या दिपक कुमारने रौप्यपदकाची कमाई केली. मोक्याच्या क्षणी संयमाने खेळ करत दिपकने दमदार पुनरागमन करत मातब्बर खेळाडूंची झुंज मोडीत काढली. दिपकने २४७.७ गुणांची कमाई केली.  इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियायी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी १० मी. एअर रायफल सांघिक प्रकारात, अपुर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने कांस्यपदकाची कमाई करत भारताला पहिले पदक मिळवून दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 02:46 PM IST

ताज्या बातम्या