सुवर्ण पदक विजेत्या गोमतीला धक्का, डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह

गेल्याच महिन्यात विक्रमी वेळ नोंदवत धावपटू गोमतीने आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 01:04 PM IST

सुवर्ण पदक विजेत्या गोमतीला धक्का, डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह

नवी दिल्ली, 21 मे : भारताला आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 800 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या गोमती मरिमुथुला मोठा धक्का बसला आहे. डोपिंग टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. यात जर ती दोषी आढळली तर तिच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. जर तिने प्रतिबंध असलेल्या स्टेरॉईडचं सेवन केल्याचं समोर आलं तर गोमतीसाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते.

भारताच्या अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष आदिली सुमरीवाला यांनी गोमतीच्या डोपिंगमध्ये दोषी आढळल्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नसल्याचं म्हटंल आहे. गोमती मरिमुथुने गेल्या महिन्यात सुवर्ण पदक मिळवताने स्वत:ची सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. मार्चमध्ये सुद्धा तीन फेडरेशन कपमध्ये विक्रमी वेळ नोंदवली होती.

वाचा गोमतीची संघर्षगाथा : 'माझ्या सुवर्णपदकासाठी वडिलांनी खाल्लं जनावरांचं खाद्य'

डोपिंग म्हणजे काय?

डोपिंग टेस्ट ही प्रशिक्षण शिबिरात किंवा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरण्यापूर्वी घेतली जाते. मेक्सिको ऑलिम्पिक वेळी 1968 मध्ये पहिल्यांदाच भारतात डोपिंग टेस्ट घेण्यात आली होती. स्टेरॉयड, पेप्टाइड हार्मोन, नार्कोटिक्स, डाइयूरेटिक्स आणि ब्लड डोपिंग या 5 प्रकारच्या उत्तेजक घेण्याचा यात समावेश आहे.

Loading...

दोषी आढळल्यास काय़?

खेळाडूच्या युरीनचे नमुने तपासून त्यात पॉझिटीव्ह आढळल्यास खेळाडूवर बंदी घालण्यात येते. त्यानंतर खेळाडू बी टेस्ट देऊ शकतो. मात्र, त्यातही टेस्ट पॉझिटीव्ह आल्यास खेळाडू स्पर्धेतून बाद केला जातो. वाडा म्हणजे विश्व डोपिंग संस्था आणि नाडा म्हणजे राष्ट्रीय डोपिंग संस्था यांच्याकडून ही टेस्ट घेण्यात येते.

भर चौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार, CCTV VIDEO आला समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 01:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...