Asia cup 2018- पराजय पचवू शकला नाही पाकिस्तानचा कर्णधार, झाला या आजाराने ग्रस्त

Asia cup 2018- पराजय पचवू शकला नाही पाकिस्तानचा कर्णधार, झाला या आजाराने ग्रस्त

कर्णधारपदाचा दबाव नेहमीच असतो. कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूवर हा जबाव असतो

  • Share this:

दुबई, २८ सप्टेंबर- पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने खुलासा करत म्हटले की, एशिया कपमध्ये संघाच्या खराब प्रदर्शनामुळे सहा दिवस त्याला झोप लागली नाही. पाकिस्तानला सुपर- ४ सामन्यात करो या मरो परिस्थितीत बांग्लादेशविरुद्ध हार पत्करावी लागली. यामुळे पाकिस्तानचे भारताविरुद्ध अंतिम सामन्यात खेळण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

पाकिस्तानला भारताविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सरफराज म्हणाला की, कर्णधारपदाचा दबाव नेहमीच असतो. कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूवर हा जबाव असतो. कर्णधारपदाचा दबाव आणि धावा न झाल्यामुळे तो कित्येक रात्री झोपला नाही.

तो पुढे म्हणाला की, ‘जेव्हा तुम्ही चांगलं प्रदर्शन करत नाहीत आणि संघ हरत असतो तेव्हा हा दबाव दुप्पट होतो. मी जर बोललो की गेल्या सहा दिवसांपासून मी झोपलो नाही तर कोणी माझा विश्वास करणार नाही. पण हेच सत्य आहे. हा एक आयुष्याचा हिस्सा आहे.’

आमिर कसोटी सामन्यातून बाहेर

गोलंदाज मोहम्मह आमिरला पुढील महिन्यात युएईमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत जागा देण्यात आली नाही. आमिरला एशिया कप २०१८ मध्ये खराब प्रदर्शनाच्या कारणामुळे संघातून बाहेर काढण्यात आलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कसोटी मालिकेसाठी १७ खेळाडूंची घोषणा केली. यात मोहम्मद आमिरचे नाव नाही.

पाकिस्तानी संघ- सरफराज अहमद (कर्णधार- यष्टीरक्षक), अजहर अली, इमाम उल हक, फखर जमान, बाबर आजम, अशद शफिक, हारिस सोहेल, उस्मान सलाहुद्दीन, मोहम्मद रिजवान, फहीम अशरफ, शादाब खान, बिलाल आसिफ, यासिर शाह, मोहम्मद अब्बास, वहाब रियाज, हसन अली, मिर हमजा.

Lata Mangeshkar Birthday: नेहा राजपालनं दिल्या सुरमयी शुभेच्छा

First published: September 28, 2018, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading