News18 Lokmat

गब्बरसाठी मौका- मौका, मोडू शकतो जयसूर्याचा हा मोठा रेकॉर्ड

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2018 06:39 PM IST

गब्बरसाठी मौका- मौका, मोडू शकतो जयसूर्याचा हा मोठा रेकॉर्ड

इंग्लंड दौऱ्यात शिखर धवन सपशेल अपयशी ठरला. पण याचा पूर्ण वचपा त्याने एशिया कपमध्ये काढला असेच म्हणावे लागेल. टीम इंडियाच्या या गब्बरने चार सामन्यात दोन शतकांसह सर्वाधिक ३२७ धावा केल्या आहेत. एशिया कप २०१८ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो अग्रणी आहे.

धवनने आतापर्यंत १२७, ४६, ४० आण ११४ धावा सामन्यात काढल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. बांग्लादेशविरुद्ध आज खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात त्याच्याकडून याचपद्धतीची तुफानी खेळी अपेक्षित आहे.

जर शिखरने अंतिम सामन्यात किमान ५२ धावा केल्या तो एशिया कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होईल. हा रेकॉर्ड श्रीलंकेचा फलंदाज सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. सनथने २००८ एशिया कपमध्ये ३७८ धावा केल्या होत्या.

सध्या धवनने ३२७ धावा करत महेंद्र सिंग धोनीशी बरोबरी केली आहे. धोनीने २००८ मध्ये एशिया कपमध्ये ३२७ धावा केल्या होत्या. गंमत म्हणजे २००८ मध्ये सुरेश रैनाने ३७२, वीरेंद्र सेहवागने ३४८ आणि कुमार संगकाराने ३४५ धावा केल्या होत्या.

मुश्फिकुर रहीम आणि रोहित शर्मा यांनी क्रमशः २९७ आणि २६९ धावा केल्या आहेत. अंतिम सामन्यात मोठी खेळण्यास हे दोघं यशस्वी झाले तर शिखरला टक्कर देऊ शकतात. अंतिम सामन्यात त्याने आधीच्या सामन्यांसारखीच कामगिरी केली तर मॅन ऑफ दी सीरीजचा किताब त्याच्या नावे होऊ शकतो.

मुश्फिकुर रहीम आणि रोहित शर्मा यांनी क्रमशः २९७ आणि २६९ धावा केल्या आहेत. अंतिम सामन्यात मोठी खेळण्यास हे दोघं यशस्वी झाले तर शिखरला टक्कर देऊ शकतात.
अंतिम सामन्यात त्याने आधीच्या सामन्यांसारखीच कामगिरी केली तर मॅन ऑफ दी सीरीजचा किताब त्याच्या नावे होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 28, 2018 06:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...