अश्विनी बिद्रेंच्या मारेकऱ्याचं नाव पोलीस बढतीच्या यादीत

अश्विनी बिद्रेंच्या मारेकऱ्याचं नाव पोलीस बढतीच्या यादीत

  • Share this:

मुंबई, 29 जून : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकरचं नाव पोलीस बढतीच्या यादीत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

पोलीस उपअधिक्षकाच्या निवड सूचीच्या यादीत अभय कुरूंदकर याचं नाव आहे. 2018 च्या परिपत्रकात 228 व्या क्रमांकावर कुरुंदकरचं यांच नाव आहे. आता अशा कर्मचाऱ्यांना बढती मिळणारेय का ज्यांच्यावर खुनासारखा गंभीर आरोप आहे.

डोक्यात बॅट घालून अश्विनी बिद्रेंची हत्या

पोलीस अधिकारी असलेल्या अश्विनी बिद्रे यांची अत्यंत  निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यापूर्वी त्या बेपत्ता होत्या. हे उघडकीला आल्यानंतर त्यामध्ये अभय कुरुंदकरचं नाव पुढे आलं होतं.

अश्विनी बिद्रेंची हत्या झाल्याचं उघड, हत्येनंतर शरीराचे तुकडे करून खाडीत फेकले

अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याचं नाव पदोन्नतीच्या यादीत आल्यामुळे अश्विनीचे पती राजू गोरे यांनी नाराजी व्यक्त केलीये.

काय आहे प्रकरण

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे..मुळगाव कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातलं आळते गावं..एमपीएससीची परीक्षा देऊन अश्विनी या महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्या 2006 साली. त्यापूर्वीच एक वर्ष आधीच म्हणजेच 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगलेमधील राजू गोरे यांच्याशी झाला होता. नोकरी लागल्यावर त्यांनी पुणे, नवी मुंबई, सांगली या भागात नोकरी बजावली. पण सांगलीत नोकरी करत असतानाच त्यांची ओळख एका पोलीस अधिकाऱ्याशी झाली आणि संसारात बाधाही निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी पतीशी संबंध तोडले आणि परस्पर प्रपंच थाटला. ही घटना घडली तब्बल दीड वर्षांपूर्वी...तेव्हापासून एपीआय बिद्रे या बेपत्ता होत्या. त्यानंतर पोलीस तपासात त्यांची हत्या झाल्याचं समोर आलंय.

First published: June 29, 2018, 7:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading