Elec-widget

राणेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण?

राणेंच्या  काँग्रेस प्रवेशाबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण?

काही दिवसांपूर्वी शरद पवार कोकणच्या दौऱ्यावर असताना राणेंच्या भेटीला गेले होते. त्यामुळे राणे राष्ट्रवादीत जाणार का अशीही चर्चा होती.

  • Share this:

मुंबई 21 जानेवारी : भाजपच्या मदतीने खासदार झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे हे सध्या नाराज आहेत. भाजपचे ते मित्रपक्ष असले तर त्यांना पाहिजे तो प्रतिसाद भाजपकडून मिळत नाही. त्यामुळे राणे भाजपवर नाराज आहेत. त्यातच भाजप आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता असल्यानेही राणेंची काळजी वाढवली आहे. त्यामुळे राणे पुन्हा घरवापसी करणार अशीही शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राणेंकडून असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं स्पष्ट केलं.


भाजपची शिवसेनेबरोबर युती झाली तर भाजप राणेंचा पत्ता कट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणेंना काँग्रेस आघाडीच्या कोट्यातील रत्नागिरी लोकसभा जागा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांची चाचपणी सुरू असल्याची माहितीही व्यक्त करण्यात येत होती.


राष्ट्रवदी आणि राणे

Loading...


काही दिवसांपूर्वी शरद पवार कोकणच्या दौऱ्यावर असताना राणेंच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यामुळे राणे राष्ट्रवादीत जाणार का अशीही चर्चा होती. मात्र नारायण राणे हे सध्या भाजपसोबत आहेत. त्यांनी आधी भाजपची साथ सोडावी. त्यानंतर त्यांना सोबत घेण्याबाबत विचार करू,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती.


नारायण राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची गणितं बदलली आहेत. कारण आघाडीत हा मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याची चर्चा आहे.


राणे भाजपच्या समितीत


भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी पक्षाच्या विविध समित्यांची घोषणा केली. त्यात भाजपचं संकल्प पत्र तयार करणाऱ्या समितीमध्ये नारायण राणे यांचंही नाव आहे.


संकल्प पत्र म्हणजे निवडणुकीसाठीचा जाहीरनामा असतो. हा जाहीरनामा हा अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट समजलं जातं. या समितीत ज्येष्ठ नेत्यांचा समावेश केला जातो. त्यामुळं या समितीत राणे यांना स्थान देऊन भाजपने त्यांच्या बद्दल आदर दाखविल्याचं बोललं जाते. तर  शिवसेनेलाही इशारा देण्याचं कामही यातून भाजपने केलं असल्याचे संकेत होते. मात्र नारायण राणे हे नाराज असल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2019 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...