Home /News /news /

ओरडणं, किंचाळणं इरिटेट होतं ना? पण ही महिला कलाकार याद्वारे कमवते भरमसाठ पैसे

ओरडणं, किंचाळणं इरिटेट होतं ना? पण ही महिला कलाकार याद्वारे कमवते भरमसाठ पैसे

अ‍ॅश्ले पेल्डन (Ashley Peldon) ही महिला हॉरर चित्रपट (Horror Film) व टीव्ही सीरिजमध्ये (Tv Series) व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून ओरडून, किंचाळून भरमसाठ पैसे कमवते आहे.

  नवी दिल्ली, 20 जून:   घरातील लहान मुलं गोंधळ करत मोठमोठ्याने ओरडतात वा किंचाळतात (Shouting and screaming) तेव्हा गोंगाट असह्य होतो. मुलांचं किंचाळणं बहुतांश पालकांची डोकेदुखी ठरतं. पण ओरडणं वा किंचाळणं ही एक नैसर्गिक प्रतिभा (Natural Talent) असून याद्वारे तुम्ही उत्तम पैसे कमवू शकता, असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण अ‍ॅश्ले पेल्डन (Ashley Peldon) ही महिला हॉरर चित्रपट (Horror Film) व टीव्ही सीरिजमध्ये (Tv Series) व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून ओरडून, किंचाळून भरमसाठ पैसे कमवते आहे.‘टीव्ही हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. वास्तविक पाहता अ‍ॅश्ले या एक व्यावसायिक स्क्रिम आर्टिस्ट (Professional Scream Artist) आहेत. अ‍ॅश्ले यांच्यासारखे कलाकार माइकसमोर अनेक तास भीतीदायक आवाज काढतात. या आवाजाला रेकॉर्ड करून हॉरर चित्रपटात किंवा टीव्ही सीरिजमध्ये बॅकग्राउंडला वापरलं जातं. सातव्या वर्षी कळली अनोखी प्रतिभा अ‍ॅश्ले पेल्डन यांच्यात किंचाळणं वा ओरडण्याची प्रतिभा आधीपासून आहे. याचाच वापर करून त्या पैसे कमवत आहेत. वयाच्या सातव्या वर्षी अ‍ॅश्ले यांना त्यांच्या प्रतिभेबद्दल माहिती झालं. त्यावेळी त्यांना ‘चाइल्ड ऑफ अँगर’ (Child Of Anger) नावाच्या चित्रपटात कामाची संधी मिळाली. या चित्रपटात ओरडणं व किंचाळण्याचे खूप सीन होते. आपल्या सुप्त प्रतिभेबद्दल कळाल्यानंतर त्यांनी यावर लक्ष देणं सुरू केलं आणि त्याचवेळी या क्षेत्राकडे वळाल्या. अ‍ॅश्ले यांनी ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कामाची तुलना स्टंट मॅनच्या (Stunt Man) कामाशी केली आहे. आता घरबसल्या योगात करा उत्तम करिअर, ही आहे कोर्सेची माहिती
  आठ तास सतत ओरडणे, किंचाळण्याचं काम
  माध्यमांतील वृत्तानुसार, अ‍ॅश्ले पेल्डन गेल्या 20-25 वर्षांपासून या क्षेत्राशी जोडल्या गेल्या आहेत. आजवर 40 पेक्षा अधिक चित्रपट व टीव्ही सीरिजमध्ये त्यांचा आवाज वापरला गेला आहे. या कामासाठी सरावाची गरज नसून, नैसर्गिक प्रतिभा असणारे लोक ते करू शकतात, असं त्या म्हणतात. अ‍ॅश्ले यांना 8 तासांपर्यंत ओरडणं, किंचाळण्याचं काम करावं लागतं. अनेकदा त्या थकतातही. पण या कामातून आनंद व समाधान मिळत असल्याचं अ‍ॅश्ले सांगतात. एखादे हॉरर चित्रपट पाहण्यासाठी आपण चित्रपटगृहात गेल्यानंतर त्यातील ओरडणं व किंचाण्याच्या आवाजाने आपण घाबरतो; पण हा आवाज एका व्यावसायिक स्क्रिम आर्टिस्टने दिलेला असतो. या द्वारे त्याने चांगली कमाईही केलेली असते. दरम्यान, आधुनिकतेच्या युगात नानाविध प्रकारची नवनवी क्षेत्रं निर्माण झाली आहेत. या क्षेत्रांबद्दल खूप कमी लोकांना माहिती असेल; पण बरेचदा आपल्या प्रतिभेबद्दल त्याला स्वत:ला माहिती नसतं. याची वेळीच माहिती झाली आणि त्याकडे लक्ष दिलं तर नक्कीच करिअर म्हणून त्याचा विचार होऊ शकतो, हे अ‍ॅश्ले यांच्या उदाहरणावरून दिसून येतं.
  First published:

  Tags: Career, World news

  पुढील बातम्या