मुंबई, 23 सप्टेंबर : आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या आंदोलनावर टीका केलीये. ट्विटरच्या माध्यमातून शेलार यांनी सेनेला लक्ष्य केलंय. नवरात्रीत शिमगा करणाऱ्यांना आईभवानी विवेक बुद्धी दे. शेलार इतक्यावरच थांबले नाहीत. तर सेनेनं नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. जे मोदीजींच्या नावाने निवडून आले.सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींच्या विरोधी घोषणा देतात. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात. शिवसेनेनं आज पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन केलं. त्यावेळी त्यानी वाढत्या महागाईसाठी भाजपला जबाबदार धरलं. त्याला आशिष शेलार यांनी ट्विटरुन प्रत्युत्तर दिलंय.
जे मोदीजींच्या नावाने निवडून आले.सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींच्या विरोधी घोषणा देतात. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात!