News18 Lokmat

करून दाखवलं म्हणणारे आता पळून दाखवतायत - आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला

मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं असून महापालिका जबाबदारी टाळू शकत नाही. जे करून दाखवलं असं सांगतात ते आता पळून दाखवत आहेत असा टोला भाजपचे नेते आशीष शेलार यांनी शिवसेनेला लगावलाय.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2018 04:52 PM IST

करून दाखवलं म्हणणारे आता पळून दाखवतायत - आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला

मुंबई,ता.25 जून : मुंबई महापालिकेच्या कारभाराने नागरिक त्रस्त असून लोकांना चांगल्या सेवा सुविधांची अपेक्षा आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं असून महापालिका जबाबदारी टाळू शकत नाही. जे करून दाखवलं असं सांगतात ते आता पळून दाखवत आहेत असा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावलाय.

किरकोळ पाणी साचलं,मुंबई तुंबली नाही- महापौर

वडाळ्यात दोस्ती एकर्सच्या इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळली

विधान परिषदेच्या पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मुंबईतल्या अनेक मतदान केंद्रांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत. मतदार मतदानाला येवू शकत नाहीत अशी तक्रारही त्यांनी केली. वांद्र्यातल्या मतदान केंद्रात उद्धव ठाकरे येणार असल्याने पाणी उपसण्यात आलं होतं.

क्रूर आईने 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून मारलं !

Loading...

आर्मी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्या प्रकरणात मीरतमध्ये मेजरला अटक

त्याचा उल्लेख करतही शेलार यांनी टीका केलीय. महापालिकेने केवळ एका व्यक्तिसाठी काम करू नये तर सर्व मुंबईसाठी काम केलं पाहिजे. मेट्रोच्या कामांमुळं पाणी साचलं असं म्हणणाऱ्या महापौरांना त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही. मुंबईत पाणी साचलं नाही असं म्हणणारे महापौर कुठल्या जगात वावरत आहेत ते कळत नाही अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2018 04:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...