पंढरपूर, 06 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे यंदा पंढरपूरला वारी निघणार की नाही असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण, यंदाच्या वर्षीचा आषाढी वारी पालखी सोहळा हा निघणारच आहे. प्रथा,परंपरा खंडीत होणार नाही. तसेच कोणताही प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. या बाबत सरकारशी चर्चा करणार असल्याचे माऊली पालखी सोहळ्याचे मानकरी ह.भ.प. देवव्रत वासकर महाराज यांनी जाहीर केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी सोहळा होणार का ? अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनाची आज सकाळी 9 वाजता सर्व प्रमुख संतांच्या पालखी सोहळा समन्वयकांची बैठक झाली.
हेही वाचा - पुण्यात कुठल्या परिसरात किती रुग्ण? संपूर्ण आकडेवारीसह MAP पाहाच!
यावेळी आषाढी यात्रेबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा पार पडली. या वेळी ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त अँड विकास ढगे पाटील, आरफळकर मालक, शितोळे सरदार , देवव्रत वासकर महाराज, राजाभाऊ चोपदार,अभय टिळक, कुलकर्णी, जळगावकर महाराज आदींनी चर्चेत सहभागी झाले.
सध्या अनेक पालख्यांचे मार्ग हे कोरोनाच्या रेड झोनमधून जातात. यामध्ये माऊलीचा पालखी सोहळा थेट पुणे येथून न जाता. सासवड येथून पंढरपूरकडे न्यावा. असे मार्ग यावर्षीसाठी योग्य ठरू शकतात. असेच प्रयोजन इतर पालखीसोहळ्याबाबत केले पाहिजे, अशी सूचना पुढे आली आहे.
हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये 9 महिन्यांच्या मुलाला घेऊन 1000 किमी चालणाऱ्या महिलेची कहाणी
तसंच एखाद्या पालखी सोहळ्याला जर ठराविक व्यक्तींची परवानगी मिळाली. तर संबंधित परवानगी ही सर्वच पालखीसोहळ्याला लागू असेल. तसंच प्रत्येक पालखी सोहळ्यासोबत एक वैद्यकीय पथक देखिल असणार आहे. यामध्ये संपूर्ण पायी पालखी सोहळा हा सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून केला जाणार आहे.
यंदा पालखी सोहळा प्रस्थान करीत असताना आवश्यक त्या ठिकाणी मार्ग बदलून मोठ्या डामडौलात पंढरपूरला जाईल. यामध्ये अंत्यत कमी माणसांचा समावेश असेल.
या सर्व बाबींचा अनुषंगाने या पुढच्या काळात एक समन्वय समिती सरकारशी चर्चा करेल आणि सरकारी सुचनांचा विचार करुनच पुढील निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pandharpur