मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी, आरोग्य विभागाचा मोठा निर्णय

आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी, आरोग्य विभागाचा मोठा निर्णय

राज्य शासनाकडून 2000 रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय 5 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

राज्य शासनाकडून 2000 रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय 5 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

राज्य शासनाकडून 2000 रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय 5 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

मुंबई, 17 जुलै : ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा ओळखल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात आज आरोग्य विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. हा वाढीव मोबदला 1 जुलैपासून मिळणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेतला होता. र्णय 2ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका 74 प्रकारचे विविध कामे करतात. त्याचा त्यांना कामानुसार मोबदला मिळतो मात्र राज्य शासनाकडून 2000 रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय 5 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आग्रही भूमिका मांडली होती. त्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात या जिल्ह्याने जाहीर केला कडकडीत लॉकडाऊन, 7 दिवस सर्व सेवा बंद आरोग्य विभागाने आज जाहीर केलेल्या शासन निर्णयात नमूद केले आहे की, आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाकडून नियमीत 4 कामांसाठी प्राप्त होणाऱ्या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल 2000 रुपयांपर्यंत दरमहा तसेच गटप्रवर्तकांना दरमहा 3000 रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयात केला बदल, राजकीय वर्तुळात खळबळ दरम्यान, विविध आरोग्य केंद्रातील नर्स, वॉर्ड बॉय हे कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी सर्व्हे, स्क्रिनिंग आदी कामे करीत आहेत. तर, विविध आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर्स प्रचंड धोका पत्करुन थेट रुग्णांच्या संपर्कात जात आहेत. त्यांनाही वेतन देण्यात आलेले नाही. वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असतानाही कोणत्याही प्रकारची तक्रार न करता हे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. जो भाग प्रतिबंधीत (कॅन्टोन्मेंट) केला आहे. तेथेही हे कर्मचारी जीवावर उदार होऊन जात आहेत. 1 कोटी जिंकण्याची मोठी संधी! TikTok बंदीनंतर या कंपनीने सुरू केला भन्नाट शो अशात त्यांना साधा एन 95 चा मास्कही दिला जात नाही. साधा एक मास्क दिला जात आहे. हँडग्लोव्हज, हँडसॅनिटायझर, सर्जिकल कॅप किंवा तत्सम कोणत्याही प्रकारची साधने दिली जात नाहीत. त्यातच विभागांमध्ये विविध आरोग्य सर्व्हे करणार्‍या नर्स या 45 वयाच्या पुढील आहेत. हा सर्वे केल्यानंतर त्या थेट आपल्या घरात जात आहेत. तर डॉक्टर्ससाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर आवश्यक असतानाही त्यांना ते उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही.
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या