'देशात आरडीएक्स आलं तेव्हा मोदी सरकारसोबत राहुल गांधींनाही लक्ष देता आलं नाही का?'

'देशात आरडीएक्स आलं तेव्हा मोदी सरकारसोबत राहुल गांधींनाही लक्ष देता आलं नाही का?'

या सभेला ओवैसी बोलयला उभे राहताच उपस्थितांनी मोबाईलच्या बॅटऱ्या लावतं त्यांच स्वागत केलं.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : मुंबईत शिवाजी पार्कवर वंचित बहुजन विकास आघाडीची विराट सभा झाली. त्यात बोलताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पुलवामा हल्ल्यावरून पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. मसूद अझहरची संघटना जैश ए मोहम्मद नाही तर जैश ए शैतान असल्याची टीका त्यांनी केली. त्यासोबतच 200 किलो आरडीएक्स दहशतवाद्यांकडे आलं कसं, असा सवाल त्यांनी केंद्र सरकारला विचारला.

दरम्यान, या सभेला ओवैसी बोलयला उभे राहताच उपस्थितांनी मोबाईलच्या बॅटऱ्या लावतं त्यांच स्वागत केलं. असदुद्दीन ओवैसी यांनी काश्मीरच्या प्रश्नावरही भाष्य केलं. तुम्ही त्याला पाकिस्तान व्याप्त काश्मीर का म्हणता असा जाहीर सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आणि जोरदार टीका केली.

दुसरीकडे ओवेसी यांनी पक्षांच्या भूमिकेवरही टीका केली. निवडणुका आल्या की ते मला देशद्रोही ठरवतील असंही यावेळी ते म्हणाले. निवडणुका आल्या की आता इतर पक्षातून आवाज येतील ते आपल्याला देशद्रोही ठरवतील असं ओवेसी म्हणालेत. यावेळी त्यांनी आपल्या विरोधकांवर टिका केली.

'देशात आरडीएक्स आलं तेव्हा मोदी सरकार काय करतं होतं?' मोदी सरकारसोबतच राहुल गांधींनाही लक्ष देता आलं नाही का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

'युतीवरही असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली. हे कालपर्यंत बोलत होते की युतीत जाणार नाही पण ते शेवटी ड्रामेबाजी करणार असं मी म्हणालो होतो तेच झालं' असंही ओवैसी म्हणाले. यासोबतच असदुद्दीन ओवैसी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवरही टीका केली.

तर याच सभेत प्रकाश आंबेडकर यांनीही सभेला संबोधत करताना काँग्रेस, राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते हे बिल्डर असल्याचा आरोप यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला.

VIDEO : लातूरमधील थरकाप उडवणारी घटना, अपघातानंतर मृतदेहला 22 KM नेलं फरफटत!

First published: February 24, 2019, 8:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading