मुंबई, 11 मे- 'जिस्म 2', 'ये साली जिंदगी' आणि 'ब्लॅकमेल'सारख्या सिनेमांत काम केलेल्या अरुणोदय सिंगने तो घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं. अरुणोदय सिंहने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. अरुणोदयच्या पत्नीचं नाव ली एलटन असून ती मुळची कॅनेडाची आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला होता. अरुणोदय आणि ली यांनी १३ डिसेंबर २०१६ मध्ये लग्न केलं होतं. या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली असती.
लग्नाच्या अवघ्या दोन वर्षांतच ‘जिस्म 2’ चा अभिनेता घेतोय घटस्फोट
राजेशाही थाटात लग्न करण्याची एकही संधी अरुणोदयने सोडली नव्हती. त्याचे वडील अजय सिंह हे मध्यप्रदेशचे नावाजलेले नेते आहेत. अरुणोदयचे आजोबा हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीही होते. मध्यप्रदेशच्या सीझी जिल्ह्यात अरुणोदय आणी लीने राजेशाही थाटात हिंदू पद्धतीने लग्न केलं. या लग्नाला बॉलिवूडपासून ते राजकीय वर्तुळापर्यंतच्या अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.
क्रिती, सारानंतर आता या अभिनेत्रीला डेट करतोय सुशांत सिंग राजपूत?
लग्नात जवळपास ५० हजार लोकं बोलावली होती. व्हीव्हीआयपी लोकांना येण्यास अडथळा येऊ नये म्हणून चक्क दोन हॅलीपॅड तयार करण्यात आले होते. या लग्नासाठी चुरहटपासून ते सीधीपर्यंतचे अनेक हॉटेल पाहुण्यांना राहण्यासाठी बुक करण्यात आले होते. तसेच हॉटेलपासून लग्नस्थळापर्यंत पोहोचण्यासाठी महागड्या गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
'तिचा सिनेमा पाहायला तर साधा कुत्राही गेला नाही,' ब्रेकअपनंतर सलमानने काढला तिच्यावर राग
लग्नाचं मंडप सजवण्यासाठी खास कोलकत्यावरून कारागीर बोलावण्यात आले होते. तसेच स्वागत गेटपासून लग्नमंडपापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे सजावट करण्यात आली होती. लग्नस्थळी अनेक प्रोजेक्टर लावण्यात आले होते. ज्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले लोक तिथूनच लग्नविधी पाहू शकत होते.
लग्नाआधी अरुणोदय आणि ली अनेकवर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. ली ही गोव्यातील एका मोठ्या रेस्टॉरंटची मालकीण आहे. लीच्या आधी अरुणोदयचं नाव अदिती राव हैदरीशीही जोडण्यात आले होते. दोघांनी ये साली जिंदगीमध्ये एकत्र काम केलं होतं. अदितीशी ब्रेकअप झाल्यानंतर अरुणोदय सिंह लीसोबत रिलेशनशिपमध्ये आला.
VIDEO- ‘अरे, किमान दरवाजा तरी बंद करत जा...’, शाहिद कपूरला नेटकऱ्यांनी दिला सल्ला
इन्स्टाग्रामवर अरुणोदयने लिहिले की, ‘मी गेल्या काही दिवसांपासून काही लिहित नव्हतो. यामागे एक कारण होतं, जे फार दुःख देणारं आहे. माझं लग्न संपुष्टात येत आहे. आम्ही प्रेमात फार चांगले होतो, पण वास्तवात तसं काही झालं नाही. आम्ही फार प्रयत्न केले. प्रोफेशनल काउंसलिंग आणि वेगळं होण्यापूर्वीचं ट्रायल या सर्व गोष्टी आमच्यातलं अंतर मिटवू शकली नाही. आता हेच योग्य आहे की इथेच थांबावं. मला वाटतं की आम्ही दोघांनाही यापेक्षा जास्त चांगलं काही मिळेल. आम्ही दोघंही एकमेकांचा सन्मान करत यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू.’
आपल्या सावत्र आईपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे 'ही' अभिनेत्री
SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?