04 फेब्रुवारी, नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सीएनएनशी बोलताना शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. 2014साली युती तोडताना खरंतर आम्ही शिवसेनेला मोठ्या भावाचा सन्मान देऊन जास्तीच्या जागा सोडायला तयार होतो. पण त्यांना खूपच जास्त जागा हव्या होत्या, त्यामुळेच युती तुटली, असा गौप्यस्फोट अरुण जेटली यांनी केलाय.
'नेटवर्क 18'चे मुख्य समूह संपादक राहुल जोशी यांनी जेटली यांची बजेटनिमित्त विशेष मुलाखत घेतली. त्यावेळी जेटली यांनी एनडीएतील घटक पक्षांच्या नाराजीबद्दलही भाष्य केलं. चंद्राबाबू नायडू बजेटबाबत नाराज असले तरी केंद्र सरकार आंध्रप्रदेश राज्यासाठी स्वतंत्रपणे आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्यामुळे तेलगू देसमची नाराजी दूर झाली असल्याची माहितीही जेटली यांनी दिली. एनडीएपासून फारकत घेऊ पाहणाऱ्या शिवसेनेबाबतही त्यांनी भाष्य केलं.
अरूण जेटली शिवसेनेबाबत बोलताना म्हणाले, ''शिवसेनेला गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाऊकच नव्हतं की, त्यांना नक्की किती जागांवर लढायचं आहे. आम्ही त्यांना मोठ्या भावाच्या भूमिकेत स्वीकारायला तयार होतो. मात्र, त्यांचा गोंधळ कायम होता. अखेरीस आम्हाला स्वतंत्र लढावं लागलं त्यातून भाजपनेच जास्त जागा मिळवल्या. खरंतर आगामी निवडणुकीतही, वेगळं लढण्याने आम्हाला फायदा होईल असं मी म्हणणार नाही. माझी इच्छा आहे की NDA एकसंघ रहावा. ''
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arun Jaitley, Budget interview, NDA, Rahul Joshi, Sena bjp, Shivsena