News18 Lokmat

सीबीआय प्रकरणी आम्ही काहीच करू शकणार नाही - अरुण जेटली

सीबीआय अधिकाऱ्यांमधील गैरव्यवहारासंबंधीच्या आरोप प्रत्यारोपांवर सरकारकडून अरूण जेटलींनी प्रथमच जाहीर भाष्य केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2018 02:30 PM IST

सीबीआय प्रकरणी आम्ही काहीच करू शकणार नाही - अरुण जेटली

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : सीबीआय अधिकाऱ्यांमधील गैरव्यवहारासंबंधीच्या आरोप प्रत्यारोपांवर सरकारकडून अरूण जेटलींनी प्रथमच जाहीर भाष्य केलं आहे. सीबीआयमधील सध्याची परिस्थिती ही विचित्र गोंधळाची आणि दुर्दैवी असल्याचं जेटलींनी म्हटलं आहे.

सीबीआयचं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठीच सरकारने नव्या संचालकांची नियुक्ती केली असून या सर्व गैरव्यवहारांची केंद्रीय दक्षता आयोगामार्फत नि:पक्ष चौकशी केली जाईल, असंही जेटली म्हणाले आहेत. सीबीआयच्याच दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच परस्परांवर हे आरोप केले असल्यानेच या दोघांनाही पदावरून हटवल्याचं स्पष्टीकरणही जेटलींनी दिलं.

तसंच या सीबीआय अंतर्गत चौकशीत सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नसल्याचं जेटलींनी म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर अर्थमंत्री अरूण जेटलींनी केंद्र सरकारची भूमिका मांडली.

दरम्यान, सीबीआयच्या नव्या संचालकांची नियुक्तीही वादात सापडली आहे. भ्रष्टाचारी अस्थाना यांना वाचवण्यासाठीच सरकारने आलोक वर्मा यांना हटवून नागेश्वर राव यांच्या नियुक्तीचा घाट घातल्याचा गंभीर आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे.

राफेल घोटाळ्याची चौकशी दडपण्यासाठीच सरकार सीबीआयच्या नियुक्तीत ढवळाढवळ करत असल्याचंही भूषण यांनी म्हटलं आहे. निलंबनाच्या कारवाईविरोधात सीबीआयचे माजी संचालक अलोक वर्मा यांनी कोर्टात धाव घेतलीय तर नवे संचालक नागेश्वर राव यांनी पदाचा चार्ज घेताच अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली आहे. सीबीआयमधील या सगळ्या गोंधळावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे.

Loading...

तर सीबीआयचे प्रभारी संचालक नागेश्वर राव यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. आलोक वर्मा यांना अधिकारांपासून दूर ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. सीबीआयच्या या प्रकरणात एसआयटी नेमण्याचे संकेत सरकारनं दिलेत.

तत्पूर्वी सीबीआयमधला अंतर्गत संघर्ष आता शिगेला जाऊन पोहोचला आहे. क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांमधील वादामध्ये आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करत आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. तर नागेश्वर राव यांनी सीबीआयचे नवे हंगामी संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांची कार्यालयेदेखील सील करण्यात आली आहेत. सीबीआयच्या महत्त्वाच्या तपासामधले अधिकारीही बदलण्यात आलेत. या संस्थेत नंबर एक आणि नंबर दोनचा संघर्ष सुरू आहे. सीबीआय संचालक आलोक वर्मा यांनी दुसऱ्या नंबरवरील अधिकारी राकेश अस्थाना यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप केला आहे. या प्रकारावर पंतप्रधान कार्यालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. नागेश्वर राव यांनी सीबीआयचे नवे संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. या प्रकरणात सीबीआयच्या महत्त्वाच्या तपासामधले अधिकारीहीदेखील बदलण्यात आलेत.

VIDEO: साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये पुन्हा जुंपली, तणावपूर्ण वातावरण

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2018 02:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...