आणीबाणी : अरूण जेटलींनी केली इंदिरा गांधी आणि हिटलरची तुलना

आणीबाणी : अरूण जेटलींनी केली इंदिरा गांधी आणि हिटलरची तुलना

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याच्याशी केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, ता.25 जून : देशात आणीबाणीलागू होऊन आज 43 वर्ष पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर फेसबुकवर लिहिलेल्या लेखात अर्थमंत्री अरूण जेटली यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याच्याशी केली आहे.

हिटलर आणि इंदिरा गांधी यांनी कधीही राज्यघटना रद्द ठरवली नाही मात्र त्यांनी लोकशाहीचं रूपांतर हुकूमशाहीत करण्यासाठी राज्यघटनेचा वापर केल्याचं मत त्यांनी फेसबुकवरच्या आपल्या लेखात व्यक्त केलं आहे.

हिटलरने विरोधीपक्षांच्या सदस्यांना अटक केली आणि संसदेत बहुमताच्या जोरावर मनमानी बदल करत सर्व अधिकार स्वत:कडे घेतले.

या घटनेनंतर इंदिरा गांधी यांनी केली होती आणीबाणीची घोषणा !

किरकोळ पाणी साचलं,मुंबई तुंबली नाही- महापौर

त्याचप्रमाणे इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांना अटक करून संसदेतल्या दोन तृतीयांश बहुमताच्या जोरावर राज्यघटनेत चुकीच्या दुरूस्त्या करून घेतल्या.

काही गोष्टी ज्या हिटलरने केल्या नाहीत अशा अनेक गोष्टी इंदिरा गांधी यांनी केल्या होत्या.

त्यांनी संसदेच्या कार्यावाहीचं वार्तांकन करण्यास त्यांनी माध्यमांना मनाई केली. संसदेची कार्यवाही प्रसिद्ध करू दिली जावी यासाठी फिरोज गांधी यांनी पुढाकार घेतला होता. त्याच आधारे त्यांनी त्या काळात हरिदास मुंद्रा घोटाळा बाहेर काढला होता. अशा पद्धतीचे बदल हिटलरने कधी केले नव्हते. निवडणूकीतल्या गैरप्रकाराच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांची निवडणूक अवैध ठरवली होती.

क्रूर आईने 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून मारलं !

पाथर्डीमध्ये एसटी चालकाला मारहाण, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

इंदिरा गांधी यांनी राज्यघटना आणि लोकप्रतिनिधी कायद्यात सुधारणा करून हा निकाल रद्द केला होता. लोकशाहीचं राजघराण्याची सत्ता असलेल्या लोकशाहीत करण्याचा त्यांचा प्रयत्न होता असंही अरूण जेटली यांनी फेसबुकवरच्या आपल्या लेखात म्हटलं आहे.

जेटलींच्या या लेखामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष हे कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिटलस्टाईलने कारभार करतात असे आरोप करत असतात आता जेटलींनी इंदिरा गांधी आणि हिटलरची तुलना केल्याने काँग्रेस काय उत्तर देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

 

First published: June 25, 2018, 3:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading