INDIASTRIKESBACK 'रामाने रावणाला, कृष्णाने कंसाला मारलं, आता मोदी मसूदला ठार करतील'

INDIASTRIKESBACK 'रामाने रावणाला, कृष्णाने कंसाला मारलं, आता मोदी मसूदला ठार करतील'

भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशभरात नागरिकांनी जल्लोष केला. भारतीय वायुसेनेचं आणि सैन्यदलांचं कौतुक केलं गेलं. सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. काही कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत, काहींनी सल्ले दिले, तर काही कलाकारांनी मात्र तारे तोडले आहेत.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशभरात नागरिकांनी जल्लोष केला. भारतीय वायुसेनेचं आणि सैन्यदलांचं कौतुक केलं गेलं. सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. काही कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत, काहींनी सल्ले दिले, तर काही कलाकारांनी मात्र तारे तोडले आहेत.

विनोदी कलाकार राजू श्रीवास्तवने आज वायुदलाने केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करत एक वक्तव्य केलयं की, "कलम 370 हटवून कश्मीरला 4-5 ट्रेननी यूपी-बिहारला जोडावे. जेणेकरून यूपी-बिहारची लोक तिथे जाऊन सर्व सांभाळतील आणि अतिरेक्यांशीही सामना करतील."

‘महाभारत’ मालिकेमध्ये युधिष्ठीराची भूमिका केलेल्या अभिनेता गजेंद्र चौहान यांनी भारतीय वायुसेनेने केलेल्या धाडसी एअर स्ट्राईकबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करत चौहान म्हणाले की, "रामाने रावणाला मारलं होत. कृष्णाने कंसाचा संहार केला होता आणि ओबामांनी ओसामा बिन लादेनला संपवलं होतं. आता तसंच पंतप्रधान मोदी मसूदला ठार करतील आणि हे होणारच". गजेंद्र चौहान भारतीय जनता पक्षाला जवळचे आहेत. त्यांना यापूर्वी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटचे (FTII) प्रमुखपद दिल्यावरून वाद झाला होता. त्यांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांसह अनेकांनी आक्षेप घेतले होते.

मंगळवारी पहाटे 3 वाजता भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये बालाकोटमधील जैशच्या अतिरेकी अड्ड्यांना उद्ध्वस्त केले. या हल्ल्यामध्ये 300 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात वायुसेनेला यश मिळाले आहे. या हल्ल्यामध्ये जैशच्या म्होरक्याचा नातलग युसूफ अझरही मारला गेला.

भारतीय वायुदलाने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या अल्फा ३ कंट्रोल रूमला नेस्तनाबूत केले. २००१ मध्ये इंटेलिजन्स एजन्सींनी सांगितलं होतं की, बालाकोट परिसरात जैश-ए-मोहम्मद रॅलाही करतं. बालाकोट येथील बेसयान चौक येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षणही देण्यात येतं. असंही म्हटलं जातं की, हा तोच परिसर आहे जिथे अमेरिका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या दहशतवादी कारवाईचं प्लॅनिंग केलं होतं.

पुलवामानंतर १५ दिवसांच्या आत घेतला बदला

हा एअर स्ट्राइक पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन आठवड्यात करण्यात आला. १४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर हल्ला केला. यात ४० जवान शहीद झाले. पाकिस्तानमध्ये बसून दहशतवादी हल्ल्याचं प्लॅनिंग करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.

First published: February 26, 2019, 7:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading