अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर 6 मार्च : बारावीनंतर काय कारावं असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला असतो. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्याची संधी सर्वांना मिळते असं नाही. काही विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते. पण या क्षेत्रामध्ये पदवी मिळवायची असेल तर पुणे किंवा मुंबईतील मोठ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो ही त्यांची अडचण असते. सोलापूरमधील विद्यार्थ्यांची ही अडचण आता दूर होणार आहे.
सोलापूरमध्ये मोठी संधी
जागतिक दर्जाचे चित्रकार म्हणून ओळख असणारे सचिन खरात यांच्या पुढाकाराने आणि परिश्रमातून हे महाविद्यालय उभे राहत आहे. सोलापूर फाईन आर्ट कॉलेजला नागपूर विद्यापीठाची मान्यता आहे. यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकारचे शिष्यवृत्ती सुद्धा मिळणार आहे सध्या कॉलेजचे संचालक सचिन खरात आणि उपप्राचार्य देविदास मिटकरी हे दोघे मिळून कॉलेजचे कामकाज पाहत आहेत.
मुंबई-सोलापूर गाडीचा वेग कधी वाढणार? रेल्वेनं दिली मोठी माहिती, Video
चित्रकलेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य तसेच पेंटिंग करण्यासाठी वेगवेगळे कलादालन माती कामासाठी वेगळे झालं कार्यक्रमासाठी ओपन हॉल तसेच गर्ल्स हॉस्टेल आणि बाहेरून येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना राहण्याचे उत्तम सोय येथे करण्यात आली आहे. कलेच्या शिक्षणात असणारी सर्व आधुनिक सामग्री या महाविद्यालयात असून येणाऱ्या काळात सोलापुरातून अनेक कलाकार येथेच घडतील.
काय आहे हेतू?
मागील अनेक वर्षांपासून सोलापुरातील दिग्गज कलाकार पुणे मुंबईला स्थलांतरित होताना मी पाहिले आहे. या कलाकारांना कलेतील उत्तम शिक्षण मिळावे. त्यांनी सोलापुरातच राहूनच रोजगार शोधावा हा माझा मुख्य हेतू आहे. मु मुंबईमधील जे जे आर्ट्स च्या धरतीवर हे सोलापुरातील पहिले दालन उभे केले आहे. शासकीय सर्व योजनांचा लाभ यावेळी विद्यार्थ्यांना घेता येईल.
Solapur News: सापशिडीतून शिकवलं गणित, कल्पक शिक्षकाला मिळाला मोठा पुरस्कार! Video
त्यामुळे कलाक्षेत्रात आपले करिअर घडवणाऱ्या सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांनी एकदा तरी या कॉलेजला व्हिजिट करावी असं आवाहन खरात यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.