05 सप्टेंबर : मुंबईतील सामूहिक बलात्कार घटनेला महिना उलटत नाही तोच सोलापुरात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली.
सोलापूर जिल्ह्यातल्या तडवळे गावात बुधवारी ही घटना घडली. तडवळे गावात एका विवाहितेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केलाय. पीडित महिला शेतातून घरी परत येत असताना तीन नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला.
पीडित महिलेनं वैराग पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केलीय. या तक्रारीवरून वैराग पोलिसांनी आरोपी समाधान पवार, भाऊ जाधव,प्रकाश आवारे या तिघांना अटक केलीय. या तिन्ही आरोपींना 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. पीडित महिलेवर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.