News18 Lokmat

पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहत नाही -नरेंद्र मोदी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2013 03:04 PM IST

narendra modi05 सप्टेंबर : समस्त मोदी समर्थक, भाजप आणि संघ नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असं दिव्य स्वप्न पाहत असले तरी खुद्द नरेंद्र मोदी यांनी मात्र कार्यकर्त्यांचं आज स्वप्न भंग करणारं वक्तव्य केलंय. आपण पंतप्रधानपदाचं स्वप्न बघत नाहीय, मला अजून गुजरातसाठी खूप काम करायचं आहे असं भाजपचे प्रचार प्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

 

तसंच 2017 पर्यंत मला गुजरातच्या जनतेनं सेवा करण्याची संधी दिलीय आणि आपलं त्यावरच लक्ष असल्याचंही मोदी यांनी म्हटलंय. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात मुलांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोदी यांनी हे वक्तव्य केलंय.

 

ते पुढे म्हणाले, जी लोक स्वप्न पाहतात त्यांची नेहमी स्वप्न भंग होता आणि ती लोक संपुष्टात येतात. त्यामुळे आपण फक्त काम करत राहावं. नेहमी काहीतरी विचार करत केला पाहिजे कारण एका विचारामुळेच एक चांगले कार्य सफल होतं असते असंही मोदी म्हणाले.

Loading...

 

विशेष म्हणजे पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केलीय.भाजपने प्रचाराची धुराही नरेंद्र मोदींकडे सोपवलीय. मोदींना पंतप्रधान करावे यासाठी भाजप आणि संघाने जवळपास निश्चित केलंय. मात्र भाजपमध्ये अजूनही पंतप्रधान कोण होणार यावरून वाद सुरू आहे.पण वाद काहीही सुरू असला तरी मोदी समर्थक पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीना स्विकार असून त्यासाठी प्रचारालाही लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2013 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...