S M L

नोकियाचा 'हात' मायक्रोसॉफ्टच्या 'हातात'

Sachin Salve | Updated On: Sep 3, 2013 04:45 PM IST

नोकियाचा 'हात' मायक्रोसॉफ्टच्या 'हातात'

microsoft-nokia-dea

'शेकहॅन्ड डील', नोकिया मायक्रोसॉफ्टमध्ये विलिन

03 सप्टेंबर : दणकट,टिकाऊ आणि मजबूत अशी ख्याती प्राप्त झालेल्या नोकिया मोबाईल कंपनीने आता प्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचा 'हात' धरला आहे. मायक्रोसॉफ्टनं 7.2 अब्ज युरो डॉलर्सला नोकियाचा हँडसेट उद्योग विकत घेतलाय. या दोन्ही कंपन्यांमध्ये सोमवारी रात्री करार झालाय. या करारनुसार स्टीफन इलॉप मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ राहणार आहे.

 मायक्रोसॉफ्ट कंपनीने करारानुसार नोकियाला 3.79 अब्ज युरो डॉलर्स हे मोबाईलची निर्मिती, तांत्रिक अधिकारासाठी दिले तर 1.65 अब्ज युरो डॉलर्स हे पेटेंटसाठी दिले आहे. हा व्यवहार पुढच्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत होण्याची शक्यता आहे. पण हा व्यवहार पूर्ण होण्यासाठी शेअर बाजारातील शेअर होल्डरचीही मान्यता घ्यावी लागणार आहे. मायक्रोसॉफ्ट आणि नोकियामध्ये 2011 मध्ये पार्टनरशिप झाली होती. यामुळे नोकियाने आपला पहिला विंडोज फोनही लॉन्च केला होता.

 

आता या खरेदी व्यवहारामुळे नोकियातील तब्बल 32 हजार कर्मचारी आता मायक्रोसॉफ्ट कंपनीत विलिन होणार आहे. त्यामुळे कंपनी, शेअर होल्डर आणि कर्मचार्‍यांना खूप फायदा होईल. नोकियाची गुणवत्ताही मायक्रोसॉफ्टसाठी फायदेशीर ठरेलं असा विश्वास मायक्रोसॉफ्टचे सध्याचे सीईओ स्टीव्ह बॉमर यांनी व्यक्त केला. मोबाईल बाजारात एकेकाळी बादशाह असलेली नोकिया कंपनीला मध्यंतरी घरघर लागली होती.

Loading...
Loading...

 

बाजारात अँड्राईड फोन घेऊ सॅमसंग कंपनीने धुमाकूळ घातला त्याचबरोबरच ऍपलनेही बाजारात आपली पकड मजबूत केली. त्यामुळे नोकियाच्या सिंबियन्स फोनकडे ग्राहकांनी सपेशल पाठ फिरवली. या पडझडची काळात मायक्रोसॉफ्टने ऐनवेळी हात दिला त्यामुळे नोकियाचा विंडोज फोन लॉन्च झाला. पण सध्या मोबाईल बाजाराची परिस्थिती पाहता अँड्राईड फोनचाच बोलबाला जास्त आहे.

 

सुरुवातील दोन प्रमुख कंपन्या होता आता तर अँड्राईडमध्ये कित्येक कंपन्यांनी बसतान मांडले आहे. त्यामुळे नोकियाने एक समजदारीचा फैसला घेत आपला हात मायक्रोसॉफ्टच्या हातात दिल्याचं बोललं जात आहे. पण आता या निमित्ताने सॉफ्टवेअर क्षेत्रात दादा असलेली मायक्रोसॉफ्ट कंपनी आता मोबाईल फोन क्षेत्रात प्रवेश करणार हे स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2013 02:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close