मुंबईत बेस्टची वीज कडाडली

मुंबईत बेस्टची वीज कडाडली

  • Share this:

best electricity30 ऑगस्ट : 'गोविंदा रे गोपाळा' म्हणत गुरूवारी मुंबईकरांनी दहीहंडी उत्सवाचा मनमुरान आनंद घेतला मात्र आज मुंबईकरांच्या आनंदावर बेस्टने आणखी एक दरवाढीचा 'थर' लावला आहे. बेस्टनं 1 सप्टेंबरपासून वीज दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

0 ते 30 युनिटला 56 पैसे असलेला दर आता 67 पैसे होणार आहे. 100 युनिटला पूर्वी प्रतियुनिट दोन रुपये 61 पैसे मोजावे लागायचे. ते आता तीन रुपये होणार आहे. 300 युनिट्साठी पूर्वी प्रतियुनिट 4 रुपये 80 पैसे होते ते आता 5 रुपये 53 पैसे होतील.

तर 300 ते 500 युनिट्स वीजवापरासाठी पूर्वी प्रतियुनिट 6 रुपये 8 पैसे होते. ते आता सात रुपये 79 होणार आहे. वीज नियम आयोगानं या दरवाढीसाठी मंजुरी दिलीय. या दरवाढीचा मुंबईतल्या दहा लाख वीज ग्राहकांना फटका बसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2013 07:30 PM IST

ताज्या बातम्या