India vs West Indies : वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात एक मोठा बदल

India vs West Indies : वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात एक मोठा बदल

भारतानं टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजला क्लिन स्विप दिल्यानंतर एकदिवसीय मालिकेतही अशी कामगिरी करण्यास सज्ज आहे.

  • Share this:

त्रिनिदाद, 14 ऑगस्ट : भारतानं टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजला क्लिन स्विप दिल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेतही अशीच कामगिरी करण्यास सज्ज आहे. आजच्या सामन्यात वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, वेस्ट इंडीजसाठी एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. तसेच तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो. त्यामुळं वेस्ट इंडीजचा संघ गेलला विजयी निरोप देण्यासाठी मैदानात उतरेल.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने कर्णधार विराट कोहलीचं शतक आणि श्रेयस अय्यरचं अर्धशतकानंतर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीच्या जोरावर विंडीजला 59 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली. भारतासाठी शिखर धवनचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. त्याशिवाय भारताची मधल्या फळीत चौथ्या क्रमांकाची डोकेदुखी अद्याप कायम आहे. ऋषभ पंतला या क्रमांकावर समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. श्रेयस अय्यरने मात्र पाचव्या क्रमांकावर अर्धशतक करून मधल्या फळीत आपली दावेदारी पक्की करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.

कोण करणार चौथ्या क्रमांकावर फलंदाजी

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंतनं चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. मात्र, या सामन्यात त्याला चांगली फलंदाजी करता आली नाही, पंत केवळ 20 धावा करत बाद झाला. तर, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यरनं अर्धशतकी कामगिरी करत, कोहलीसोबत शतकी भागिदारी केली. यामुळं भारतानं वेस्ट इंडिजसमोर बलाढ्या आव्हान ठेवले. त्यामुळं आज चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार ते पाहावे लागणार आहे.

वाचा-टीम इंडियासाठी स्पेशल आहे 15 ऑगस्ट, 72 वर्षांनंतर मिळणार मोठी संधी!

आज गेल खेळणार अखेरचा सामना

भारताने वेस्ट इंडीज दौऱ्यातील टी20 मालिका 3-0 ने जिंकली, टी20 मालिकेत ख्रिस गेल खेळला नाही. त्यानंतर तो तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात परतला आहे. मात्र, पहिल्या सामन्यात त्याची बॅट तळपली नाही. त्याच्या एकूण कारकिर्दीतील सर्वात संथ खेळी त्यानं केली. 4 धावांसाठी तब्बल 31 चेंडू खेळला. हा सामना पावसामुळं रद्द झाला तरी गेलच्या संथ खेळीची चर्चा सर्वत्र झाली. भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना असणार आहे. हाच सामना गेलचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरण्याची शक्यता आहे. गेलला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालं नाही.

वाचा-रोहितला खुणावतोय युवराजचा विक्रम! हव्यात फक्त 26 धावा

या ठिकाणी पाहू शकता सामना

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा अखेरचा सामना सोनी नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. (Sony Network) याशिवाय Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD वर पाहू शकता. हा सामना आठ वाजता सुरु होणार आहे.

भारतीय संघ - शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, खलील अहमद.

वेस्ट इंडिजचा संघ : ख्रिस गेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शे होप, जेसन होल्डर (कर्णधार)

वाचा-गब्बरमुळे टीम इंडियात 'या' खेळाडूवर होतोय अन्याय?

ठाणे रेल्वे स्टेशनवर ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढला तरूण, लोकल थांबल्या LIVE VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 14, 2019, 6:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading