29 जानेवारी मुंबईठाणे जिल्ह्यात शिवसेनेनं आपली बाजू आणखी मजबूत केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी म्हात्रेंसोबत राष्ट्रवादीच्या इतर पाच नगरसेवकांनीही मातोश्रीवर हजेरी लावली. या नगरसेवकांनी मात्र शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलेला नाही. पुंडलिक म्हात्रेंच्या शिवसेना प्रवेशामुळे कल्याण डोंबिवलीतल्या आगरी मतांचा फायदा शिवसेनेला होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा नेतृत्वाला कंटाळून आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचं म्हात्रे यांनी यावेळी सांगितलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा