उपाशी ठेऊन जीव गेला नाही, जन्मदात्यांनीच मुलीचा घोटला गळा

उपाशी ठेऊन जीव गेला नाही, जन्मदात्यांनीच मुलीचा घोटला गळा

अंधश्रद्धेच्या आहेरी जात इथं एका 6 वर्षाच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

उत्तर प्रदेश, 07 ऑगस्ट : उत्तर प्रदेशमध्ये एक हृदय हेलावणारी एक घटना घडली आहे. अंधश्रद्धेच्या आहेरी जात इथं एका 6 वर्षाच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुरादाबादच्या चौधरपुरमध्ये एका जोडप्याने आपल्या पोटच्या गोळ्याची हत्या केली आणि तिला जमिनीत गाडलं. सुत्रांच्या माहितीनुसार, हे इतकं वाईट कृत्य त्यांनी एका बाबाच्या सांगण्यावरून केलं. या मुलीला मारल्याने त्यांच्या होणाऱ्या बाळाचे स्वास्थ चांगले राहिल यासाठी त्या आई-वडिलांनी बाळाचा जीव घेतला.

आपल्या अडचणींच्या निवारणासाठी हे कुटुंब एका तांत्रिक बाबाकडे सल्ला घेण्यासाठी जात होतं. तुमच्या मुलीला जमिनीखाली गाडल्याने तुमच्या होणाऱ्या बाळाचे स्वास्थ चांगले राहिल असा सल्ला या बाबाने दिला. आणि त्या ढोंगी बाबाच्या सांगण्यावरून या निर्दयी दांपत्याने त्यांच्या पोटच्या मुलीची हत्या केली आणि तिला गाडून टाकलं. पोलीसांना या प्रकरणाची माहिती मिळताच दांपत्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 6 वर्षाच्या तारावर या पालकांनी खूप अत्याचार केले. तिला मारण्यासाठी तिला अन्नपाणी देणं बंद केलं. आणि यासगळ्यातून अखेर ताराचा जीव गेला. आणि घरातच खड्डा खोदून त्यात तिचा मृतदेह गाडून टाकला. आजूबाजूला राहणाऱ्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तो खड्डा खोदून काढला. तर त्यात त्यांना ताराचा मृतदेह सापडला.

ताराच्या ताईच्या सांगण्यानुसार, आईला तिची मुलगी तिच्या जवळ हवी होती त्यामुळे ताराचा मृतदेह घरातच गाडण्यात आला. आम्ही ताराला खूप औषध खायला घातली होती. पण त्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे तिला वेगळ्या पद्धतीने माराव लागलं अशी माहिती ताराच्या ताईने पोलिसांना दिली.

पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर समजलं की तारा गंभीर स्वरूपात कुपोषित झाली होती. आणि गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला. ताराला गळा दाबून मारण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. लवकरच तिच्या पालकांना ताब्यात घेणार असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.

First published: August 7, 2018, 4:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading