रत्नागिरीत मनोरूग्ण तरूणीवर सामूहिक बलात्कार

  • Share this:

Image img_233172_rape345234_240x180.jpg26 ऑगस्ट : मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर बलात्काराची घटना ताजी असताना रत्नागिरीत एका 22 वर्षीय मनोरूग्ण तरूणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडलीय. रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या पानवल गावात ही घटना घडलीय.

सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचं उघड झालंय. ही तरूणी आपल्या नातेवाईकांकडे गेली होती आणि 19 ऑगस्टच्या रात्री तिथल्या सहा स्थानिकांनी बस स्टॉपच्या शेडमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी या सहा नराधमांना अटक केलीय.

त्यांना रत्नागिरीच्या कोर्टाने 2 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. हे सर्व आरोपी 18 ते 21 या वयोगटातले आहेत. या युवतीच्या आजारी आईचही रविवारी निधन झालं असुन तिच्या मामाने याबाबतची तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींना ताबडतोब अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2013 08:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading