उल्हासनगरात 5 मजली इमारत कोसळली.. वास्तव्य करत होती 31 कुटुंबे

उल्हासनगरात 5 मजली इमारत कोसळली.. वास्तव्य करत होती 31 कुटुंबे

उल्हासनगरात पाच मजली 'महक' इमारत मंगळवारी (13 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता कोसळली. एकदिवसपूर्वी सोमवारी इमारत रिकामी करुन सीलबंद करण्यात आली होती.

  • Share this:

उल्हासनगर, 13 ऑगस्ट- उल्हासनगरात पाच मजली 'महक' इमारत मंगळवारी (13 ऑगस्ट) सकाळी 10 वाजता कोसळली. एकदिवसपूर्वी सोमवारी इमारत रिकामी करुन सीलबंद करण्यात आली होती. या इमारतीत 31 कुटुंबांत तब्बल 100 जण राहत होते. त्यांना बाहेर काढण्यात आले होते. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. प्रशासकीय अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, उल्हासनगर येथील लिंकरोड परिसरात असलेल्या महक या पाच मजली इमारतीला सोमवारी सकाळी तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. धक्कादायक म्हणजे इमारत एका बाजूला झुकली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत या इमारतीतील 31 कुटुंबांना घरे रिकामी करण्याचे आदेश देऊन इमारत सील केली होती. मात्र, महक इमाकत धोकादायक इमारतींच्या यादीत नसतानाही या इमारतीला तडे गेल्याने इमारतींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

डोंगरी इमारत दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू

दरम्यान, मुंबईतील डोंगरी परिसरात एक चार मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला होता. 'केसरबाई' ही 4 मजली निवासी इमारत होती. म्हाडाच्या या इमारतीत 15 कुटुंब राहत होती. या दुर्घटनेला मुख्यमंत्री जबाबदार असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली होती. इमारत 100 वर्षे जुनी होती. ती धोकादायक होती.

VIDEO: लवासा सिटीमुळे निसर्गाचा मुडदा पडला, महापुरावर बोलताना संभाजी भिडेंना अश्रू अनावर

Published by: Sandip Parolekar
First published: August 13, 2019, 11:09 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading