'आता तरी महिला आयोगाला अध्यक्ष नेमा'

'आता तरी महिला आयोगाला अध्यक्ष नेमा'

  • Share this:

Image img_232392_mahilayoug3423_240x180.jpg24 ऑगस्ट : मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. राज्यभरातल्या महिला तर संतप्त झालेल्या आहेतच. पण पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा मुद्दा समोर आलाय.

सामाजिक कार्यकर्ते आणि महिला नेत्यांनी आतातरी राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नेमा, असा आग्रह धरलाय. याचबाबत आज मुंबईत निदर्शनं होणार आहेत. राज्य महिला आयोगाला गेल्या 4 वर्षांपासून अध्यक्ष नाहीये.

वारंवार सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी करूनही सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक वेळा आश्वासन देऊनही हे पद रिकामंच आहे.

First published: August 24, 2013, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading