सेहवागला मिळाली कोच होण्याची ऑफर, मिळणार इतकं मानधन!

सेहवागला मिळाली कोच होण्याची ऑफर, मिळणार इतकं मानधन!

भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग नेहमीच आपल्या ट्वीटमुळं चर्चेत असतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग नेहमीच आपल्या ट्वीटमुळं चर्चेत असतो. सेहवागनं याआधी भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी कागदावर आपला अर्ज लिहून पाठवला होता. त्यामुळं त्याला ट्रोल करण्यात आले होते. आता पुन्हा सेहवागच्या एक ट्वीटमुळं तो ट्रोल होत आहे.

सेहवागनं भारतीय संघासाठी निवड समितीमध्ये सामिल होण्याची तयारी दाखवली आहे. सेहवागनं, “मी निवड समितीत जाण्यासाठी उत्सुक आहे. कोण देणार मला जागा?”, असे ट्वीट केले आहे. सेहवाग अशा ट्वीटसाठी ओळखला जातो. त्याच्या या ट्वीटवर चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

चाहत्यांनी घेतली सेहवागची फिरकी

सेहवागच्या ट्वीटवर चाहत्यांनी, मी तर तुझ्यासाठी 5 हजार रूपयांची ऑफरही दिली आहे. तर एका चाहत्यांनी, माझ्या गल्लीत एक संघ आहे, त्यासाठी निवड करण्यासाठी एकाची गरज आहे. निवड केल्यास 5 हजार आणि प्रशिक्षण केल्यास 10 हजारपर्यंत पगार देईन असे म्हणतं ट्रोल केले आहे.

म्हणून व्हायचे आहे सेहवागला सिलेक्टर

सेहवागनं ट्वीट केले असले तरी, तो निवड समितीत सामिल होऊ शकत नाही. निवड समितीत सामिल होण्यासाठी 60 वर्ष वय लागते. हा नियम वगळता, सेहवाग इतर सर्व नियमांमध्ये पात्र आहे.

सेहवागनं स्वत:लाच केले ट्रोल

आजच्या दिवशी सेहवानं एका कसोटी सामन्यात दोन वेळा शुन्य़ावार बाद होण्याची निराशाजनक कामगिरी केली होती. मात्र या आक्रमक फलंदाजानं आर्यभट्टच्या शुन्याच्या संशोधनावर स्वत:ला ट्रोल केले.

यावर सेहवागनं, “आजच्या दिवशी आठ वर्षांआधी मी इंग्लंडमध्ये दोन वेळा शुन्यावर बाद झालो. त्यानंतर 188 ओव्हर फिल्डिंग केली. माझ्याकडून ही आर्यभट्ट यांना श्रध्दांजली आहे”, असे ट्वीट केले.

मराठवाड्यासाठी खूशखबर, 'जायकवाडी'ची दारं उघडणार? या आहे टॉप 18 बातम्या

Published by: Akshay Shitole
First published: August 12, 2019, 8:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading