'ड्रॅगन'ची पुन्हा वळवळ, अरूणाचलमध्ये 20 किमी.पर्यंत घुसखोरी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2013 06:03 PM IST

'ड्रॅगन'ची पुन्हा वळवळ, अरूणाचलमध्ये 20 किमी.पर्यंत घुसखोरी

chian army21 ऑगस्ट : भारतीय नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कुरापाती सुरूच आहे तर दुसरीकडे 'ड्रॅगन'ने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. चीनच्या सैन्यानं पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केलीय. अरूणाचल प्रदेशातल्या चागलगाम भागात 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून चीन सैन्य भारतीय हद्दीत तब्बल 20 किलोमीटर आत आले होते. एवढंच नाही तर चीनच्या टीमने इथं दोन दिवस मुक्कामही केला होता. सीमारेषेबद्दल स्पष्टता नसल्यानं चीनचं सैन्य भारतीय हद्दीत घुसल्याचं सूत्रांकडून समजतंय.

चागलगाममध्ये फिश टेल भागाच्या प्लम प्लम पोस्टमधून चीनी सैन्य दाखल झालं. या भागाची देखरेख भारज-तिबेट सीमा पोलिसांकडे आहे. जेंव्हा हा प्रकार लक्षात आला तेव्हा भारतीय सैन्याला बोलावण्यात आले त्यानंतर चीन सैनिकांनी माघार घेतली आणि परत गेले. पण स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, चीनचं सैन्य याच भागात कॅम्प लावून थांबलेले आहे. भारतीय सैन्याने या भागात सुरक्षा वाढवलीय.

पण दोन्ही देशाकडचे सैनिक आपल्या जमिनीचा दावा करतात आणि अशी घुसखोरी करत असतात. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभिर्याने घेण्याची गरज नाही असं भारतीय सैन्याचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यात चीन सैन्यानं तब्बल 150 वेळा घुसखोरी केलीय. चीनचं म्हणणं आहे की, ही जमीन आमची आहे. लडाखमध्ये ही चीन सैनिकांनी घुसखोरी करून ही जागा आमची असून भारताने माघार घ्यावी असे बॅनरच झळकावले होते. एवढंच नाहीतर भारतीय सैनिकांनी सुरक्षेसाठी लावलेले कॅमेरेही फोडून टाकले होते.

सुरक्षा विश्लेषकांच्या मते चीन घुसखोरी करून जमीन बळकावण्याचा मार्गावर आहे. त्याला भारताने उत्तर दिले पाहिजे. तर 1962 नंतर अरूणाचल प्रदेशमध्ये चीनने केलेली ही घुसखोरी आतापर्यंतची सर्वाच मोठी घटना आहे. आम्हाला युद्ध नको पण आपली सुरक्षा करण्यासाठी तरी सरकारने पाऊल उचलावे अशी मागणी येथील भाजपचे नेते किरण रिजीजू यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 21, 2013 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close