आरक्षणासाठी लिंगायतांची मंत्रालयावर धडक

आरक्षणासाठी लिंगायतांची मंत्रालयावर धडक

28 जानेवारी, मुंबई आशिष जाधव मराठा समाजापाठोपठ आता लिगायत समाजानंही ओबीसी आरक्षणाची मागणी केलीय. लिंगायत वाणी आणि इतर पोटजातींना 5 टक्के ओबीसी आरक्षण देण्यात यावं अशी मागणी शिवा या लिंगायत समाजाच्या संघटनेनं केलीय. या मागणीसाठी संघटनेनं आज शंखनाद करत मंत्रालयावर धडक दिली. मंत्रालयाच्या प्रवेश द्वारावर मंत्रालयाच्या प्रतिकृतीला हार घालून गुलाबाची फूलं वाहून गांधीगिरीनं आंदोलन केलं. या आंदोलनासाठी लिंगायत समाज हातात त्रिशूळ आणि भगवे झेंडे घेऊन लिंगायत समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला होता. आंदोलनापूर्वी लिंगायत आरक्षण हक्क परिषद पार पडली. राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी आरक्षणासाठी या परिषदेमध्ये जोरदार शक्ति प्रदर्शन केलं. " आम्हालाही आरक्षणाची गरज भासत आहे. आम्हालाही वाटतं की आपल्या समाजाचा विकास व्हावा, असं आम्हालाही वाटतंय, असं शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे म्हणाले. या परिषदेला आर.आर.पाटीलसुद्धा उपस्थित होते. पण त्यांनी आरक्षणाचं राजकारण कसं होतयं हेच उपस्थितांना पटवून दिलं.आरक्षणाच्या निमित्तानं आपलं सामाजिक स्थान सोडून प्रत्येक जात अधिकाधिक मागास होण्याचा प्रयत्न करतेय

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2009 02:47 PM IST

ताज्या बातम्या