S M L

जमिनीच्या वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Sachin Salve | Updated On: Aug 17, 2013 04:41 PM IST

जमिनीच्या वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

17 ऑगस्ट (पंढरपूर): माळशिरस तालुक्यातील वेळापूरमध्ये जमिनीच्या वादातून तिघांवर पेट्रोल ओतून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांच्यावर अकलूज उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.

20 ते 25 लोकांनी शेतात येऊन अशोक पवार आणि त्यांच्या आईवडिलांना दमबाजी केली आणि अशोक पवार यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं. पवार यांना वाचवताना त्यांचे आईवडीलही गंभीरपणे भाजले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची भेट घेतली. त्यानंतर या प्रकरणी आता 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरूवारी रात्री उशीरा एकाला ताब्यातही घेण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2013 02:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close