'सिंधुरक्षक'च्या 5 जवानांचे मृतदेह सापडले, 13 जवानांचा शोध सुरू

'सिंधुरक्षक'च्या 5 जवानांचे मृतदेह सापडले, 13 जवानांचा शोध सुरू

  • Share this:

INS Sindhurakshak fire (11)16 ऑगस्ट : सिंधुरक्षक पाणबुडी दुर्घटनेत अडकलेल्या जवानांपैकी आणखी एका जवानाचा मृतदेह सापडलाय. आतापर्यंत 5 जवानांचे मृतदेह सापडलेत. त्यापैकी दोघांचे मृतदेह चाचणीसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेत. तर 3 जवानांचे मृतदेह आयएनएस अश्विनी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेत. इतर 13 जवानांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे.

त्यांच्या जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याचं नेव्हीच्या डायव्हर्सनी म्हटलंय. आगीत सापडल्यामुळे 4 जवानांच्या मृतदेहांची ओळख पटवणं अवघड झालंय. त्यांची डीएनए (DNA) चाचणी करण्यात येणार आहे. आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीच्या तिसर्‍या आणि चौथ्या कंपार्टमेंटमध्ये शोध मोहीम सुरू आहे.

तर स्फोट झालेल्या बॅटरी कंपार्टमेंटच्या वरच्या भागात असलेल्या टॉरपॅडो मिसाइलच्या सुरक्षेबाबत नेव्हीसमोर मुख्य आव्हान आहे. जोपर्यंत टॉरपॅडो मिसाईल सुरक्षितपणे पाणबुडीबाहेर काढले जात नाहीत तोपर्यंत धोका कायम आहे. या बचावकार्याबद्दल आज नौदलानं एक पत्रक प्रसिद्ध केलंय. ही दुर्घटना घडल्यापासून नौदलाची स्कूबा डायव्हिंग पथक अखंड काम करत आहे.

14 ऑगस्टला म्हणजे दुर्घटना घडली त्या दिवशी दुपारपर्यंत,पाणबुडीच्या आत असलेल्या उकळत्या पाण्यामुळे या पाणबुडीच्या आत प्रवेश करता आला नाही. तसंच आतल्या कंपार्टमेंट्सचे जॅम झालेले दरवाजे, तेल, पाणी यामुळे आतमध्ये पूर्णपणे अंधार आणि अत्यंत कमी दृश्यता होती. एका वेळेस एकच स्कूबा डायव्हर आतमध्ये शिरू शकत होता. सलग 48 तासांच्या अथक प्रयत्नांनतर स्कूबा डायव्हर्सना पाणबुडीच्या आत जाण्यात यश मिळालं. आज सकाळी तीन मृतदेह सापडले त्यानंतर दुपारी एक आणि संध्याकाळी एक मृतदेह सापडला आहे.

 

First published: August 16, 2013, 10:21 PM IST

ताज्या बातम्या