News18 Lokmat

'पंतप्रधानांपेक्षा माझं भाषण चांगलं होईल', मोदींचं आव्हान

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 15, 2013 01:13 PM IST

'पंतप्रधानांपेक्षा माझं भाषण चांगलं होईल', मोदींचं आव्हान

modi on pm14 ऑगस्ट: स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या होणार्‍या पंतप्रधानांच्या भाषणाकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. पण, पंतप्रधानांपेक्षा आपलं भाषण अधिक महत्त्वाचं आणि श्रवणीय असेल, असं म्हणत भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांनाच आव्हान दिलंय.

भूज इथं झालेल्या एका सभेत युवकांना संबोधित असताना मोदींनी आपल्या भाषणाची लाल किल्ल्यावरून होणार्‍या पंतप्रधानांच्या भाषणाशी तुलना करत उद्या स्वतंत्र दिनी देशातील जनतेची नजर माझ्या भाषणावर असेल अशी स्तुतीसुमनं उधळली. भूज येथील लालन कॉलेज इथं मोदींचं भाषण होणार आहे. मोदींचं म्हणणं आहे की, पंतप्रधानांचं भाषण लाल किल्ल्यावरून होईल आणि माझं भाषण लालन कॉलेजच्या मैदानातून होईल.

देशातील जनता या दोन्ही भाषणातून पंतप्रधान आणि माझी तुलना करतील. पण ती तुलना असेल आश्वासन आणि प्रत्यक्ष कामावर, निराशा आणि आशेवर तुलना होईल. उद्या पंतप्रधान आपल्या भाषणातून यूपीए सरकारचा लेखाजोखा हिशेब मांडतील पण मी आजपर्यंत केलेल्या विकासकामाचा आढावा देईल असंही मोदींनी म्हटलंय. 2001 मध्ये मोदी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राज्यस्तरीय स्वातंत्रदिनी कार्यक्रमात हजेरी लावत आले.

Loading...

पण यावेळी स्वातंत्र दिनाचा समारोह कच्छ जिल्ह्यातील मुख्य कार्यालयाजवळील लालन कॉलेज कॅम्पस इथं होणार असून मोदींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मोदींच्या या आव्हानावर काँग्रेसचे नेते आणि माहिती आणि प्रसार मंत्री मनीष तिवारींनी खेद व्यक्त केला. गेल्या 66 वर्षांपासून भारताचे पंतप्रधान जेंव्हा लाल किल्ल्यावरून भाषण करतात त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता टीका,टिप्पणी,प्रतिक्रिया देत नाही. पण पहिल्यांदा असं कुणीतरी खटाटोप करत आहे, हे अत्यंत दुर्देवी असून मोदींनी आपलं विधान मागे घ्यावं अशी मागणीही तिवारींनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2013 10:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...