कोल्हापुरात सेना-मनसे कार्यकर्त्यांची परप्रांतीयांना पिटाळले

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2013 01:58 AM IST

कोल्हापुरात सेना-मनसे कार्यकर्त्यांची परप्रांतीयांना पिटाळले

KOL_marhan12 ऑगस्ट : कोल्हापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडलीय. या मुलीवर बलात्कार करणारा नराधम हा झारखंड येथील तरूण होता. याचा राग धरून संतप्त मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परराप्रांतीय हटाव मोहीमच हाती घेतलीय. कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा परराज्यातील राहणार्‍या लोकांच्या वस्तीवर एकच हल्ला केला. परप्रांतीयांना घरातून बाहेर काढून लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केलीय. कार्यकर्त्यांच्या धाकाने परप्रांतीयांनी कोल्हापूरमधून पळ काढलाय.

शहरातल्या बोंद्रेनगर भागात रविवारी एका अल्पवयीन मुलीवर झारखंडच्या एका युवकानं बलात्कार केला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी या आरोपीला अटक केली. मात्र संतप्त  मनसे आणि शिवसेनेनं कोल्हापूर शहरात सध्या परप्रांतीय हटाव मोहीम सुरू केलीय. संतप्त मनसे च्या कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी शहरातल्या बाजारपेठेत राहणार्‍या आणि इतर भागातल्या परप्रांतीयांवर हल्ला केला.

परप्रांतीयांना घरातून बाहेर काढून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. अनेकांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. या मारहाणीत अनेक नागरिक जखमी झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय. दरम्यान, पीडित बालिकेची प्रकृती अत्यवस्थ असून तिच्यावर  खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकारानंतर अनेक परप्रातीयांनी शहरातून पळ काढलाय.मात्र या प्रकरणी पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2013 11:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...