धनंजय मुंडेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.., सुरेश धस यांचा घणाघात

धनंजय मुंडेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.., सुरेश धस यांचा घणाघात

तोडपाणी करणारे धनंजय मुंडें शेतकऱ्यांचे पैसे का देत नाही? जगमित्र कारखाना काढतो म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या, त्यांना खोटे चेक दिले, पैसे लाटले, याप्रकरणी शेतक-यांनी त्यांना कोर्टातही खेचले आहे.

  • Share this:

बीड, 8 ऑगस्ट- तोडपाणी करणारे धनंजय मुंडें शेतकऱ्यांचे पैसे का देत नाही? जगमित्र कारखाना काढतो म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या, त्यांना खोटे चेक दिले, पैसे लाटले, याप्रकरणी शेतक-यांनी त्यांना कोर्टातही खेचले आहे. ते धनंजय मुंडें आरोप करतात त्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असे प्रत्युत्तर माजी मंत्री आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ते आष्टी येथील जाहीर कार्यक्रमात बोलत होते.

आमदार धस म्हणाले की,पंकजा यांच्यावरील आरोप केवळ राजकीय द्वेषातून असतात, हे आता जनतेला माहीत झाले आहे, असे सांगून मयत शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणारांना 'वैद्यनाथ'वर बोलण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी सुनावले. राष्ट्रवादी काँग्रेसनेचा मोर्चा म्हणजे एक नाटक होते. हा मोर्चा मुळातच पालकमंत्री पंकजा मुंडे यांना विरोध करण्यासाठी होता, हे सिद्ध झाले आहे. धनंजय मुंडे यांनी मोर्चात केलेले आरोप हे केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले असून त्यांचा राजकीय द्वेष यानिमित्ताने पुन्हा उफाळून आला आहे. पोषण आहारा संदर्भात पंकजा मुंडे यांच्यावर त्यांनी केलेला आरोप तर हास्यास्पद आहे, संवेधानिकपदावर असताना कुठलाही अभ्यास न करता बेछूट आरोप करण्याची सवयच त्यांना लागली आहे, सभागृहात ते एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत, त्यामुळेच आता निवडणुकीचे निमित्त साधून हा रडीचा डाव ते खेळत आहेत, असे धस म्हणाले.

पंकजा मुंडेंनी पोषण आहारातून 1500 कोटी कमावले..

गेल्या चार वर्षांच्या टीएचआरच्या टेंडर पोषण आहारमध्ये हजार पंधराशे कोटी कमावले. साधेसुधे नाही हजार पंधराशे मग शेतकऱ्यांच्या उसाचे पैशे कां ठेवता.. असा गंभीर आरोप धनंजय मुंडें यांनी पंकजा मुंडेंवर केला. वैद्यनाथ साखर कारखान्यामध्ये ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचे थकीत बिलाचे पैशे एफआरपीसह तत्काळ द्या, अन्यथा शासनाने संचालक मंडळावर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी धनंजय मुंडें यांनी केली. पैशे आजच्या आजएफआरपीप्रमाणे द्यावेत, कायद्याने संचालक मंडळावर कारवाई करावी. अशी मागणी केली. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या घणाघाती आरोपावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

आईने प्राण सोडले पण लेकरू सोडलं नाही, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: August 8, 2019, 9:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading