कोल्हापूर, सातारा, पुण्यासाठी Red Alert, अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

कोल्हापूर, सातारा, पुण्यासाठी Red Alert, अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा

कोल्हापूर, सांगलीत पुराने हाहाकार उडाला असताना हवामान विभागाने अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे.

  • Share this:

मुंबई, 8 ऑगस्ट-  कोल्हापूर, सांगलीत पुराने हाहाकार उडाला असताना हवामान विभागाने अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर, सातारा आणि पुण्यात उद्या (9 ऑगस्ट) मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. 204 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्यास रेड अलर्ट जारी करण्यात येतो, असे सूत्रांनी म्हटले आहे.

सांगलीत बचावकार्यादरम्यान बोट उलटली, 10 जणांचा मृत्यू

सांगलीत ब्रम्हनाळमधील पलूस इथं पुरात अडकलेल्या लोकांना वाचवताना बोट बुडाल्याची माहिती आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही खासगी बोट असल्याचीही माहिती आहे. पुरात अडकलेल्या 25 ते 30 लोकांना घेऊन जाताना खासगी बोट बुडाली. त्यानंतर या बोटीतील 10 जणांचा मृत्यू झाला तर काहीजण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बचावकार्यादरम्यान ही दुर्घटना घडली आहे.

पूरस्थिती आणि बचावकार्य

कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात पूरस्थिती कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मदत आणि बचाव कार्ययुद्ध पातळीवर सुरू आहे. विभागातील 1 लाख 32 हजार 360 पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बचाव व मदत कार्यावर प्रशासनाने भर दिला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या पुराचा मुंबईलाही फटका..

सांगली आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने थैमान घातले आहे. पाणी साचल्याने अनेक नागरिक घरातच अडकले आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. कोल्हापूरमधील या पुराचा फटका मुंबईलाही बसला आहे. कारण कोल्हापूरमधून मुंबईत येणाऱ्या दुधाचा पुरवठा पुरामुळे बंद करण्यात आला आहे.

मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि ठप्प असलेल्या वाहतुकीमुळे कोल्हापुरातल्या दूध उत्पादन कंपन्यांनी दुधाचे संकलन थांबवले आहे. कोल्हापूरवरून दररोज गोकुळचे 7-8 लाख लीटर दूध, वारणाचे 3-4 लाख लीटर दूध आणि त्यासोबतच चितळे आणि इतर कंपन्यांचे 2-3 लाख लीटर दूध मुंबईत येत असते. पण जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर हा दूधपुरवठा थांबवण्यात आला आहे.

कोल्हापूरमधून मुंबईत होणारा दूधपुरवठा

कोल्हापूरमधून दररोज लाखो लीटर दुधाचा पुरवठा मुंबईत होत असतो. कोल्हापूरमधून या दुधाचा मुंबई, ठाणे, वसई-विरार, पनवेल भागात पुरवठा केला जातो. आज हा दूध पुरवठा झाला नाही. मुंबईची दररोज दुधाची गरज ही 80 लाख लीटरची आहे. यामध्ये अमूल 12 लाख लीटर दुधाचा पुरवठा करते. तर गोकुळ 6 लाख आणि वारणा 2 लाख लिटर दुधाचा पुरवठा करते. कोल्हापूर-सांगलीमधून विविध कंपन्यांचे मुंबईत दररोज 13 लाख लीटर दूध दाखल होते. मुंबईमध्ये देशभरातून दररोज एकूण 55 लाख लीटर दूध पॅकिंग पिशव्यांमधून पुरवलं जातं, तर 25 लाख लीटर दूध टँकरद्वारे आणलं जातं.

आईने प्राण सोडले पण लेकरू सोडलं नाही, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: August 8, 2019, 9:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading