पाकचा भारतीय सैनिकांवर हल्ला, 5 जवान शहीद

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2013 10:51 PM IST

Image img_227742_locboradarpakvsindia_240x180.jpg06 ऑगस्ट : एकीकडे मैत्रीचा हात पुढे करणार्‍या पाकिस्तानने पुन्हा एकदा ना'पाक' हल्ला केलाय. पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू आणि काश्मीरमधल्या पूँछ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या गस्तपथकावर हल्ला केला. नियंत्रणरेषेजवळ चाकन दा बाग या गावात ही घटना घडली. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. संरक्षण क्षेत्रातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 16 पाकिस्तानी सैनिकांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर भारतीय हद्दीत घुसखोरी केली. त्यानंतर त्यांनी भारतीय हद्दीत सरल चौकीच्या गस्तपथकावर हल्ला चढवला. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्ताननं भारतीय हद्दीत गोळीबार केल्याच्या घटनांमध्ये वाढ झालीये. जुलैमध्ये पाकिस्तानच्या सैन्यानं केलेल्या हल्ल्यांमध्ये बीएसएफचे काही जवान जखमी झाले होते. या हल्ल्याचा भारत-पाकिस्तान शांतता चर्चेवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2013 03:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...