खासदार सचिनची राज्यसभेत हजेरी

खासदार सचिनची राज्यसभेत हजेरी

  • Share this:

sachin in rajasabha05 ऑगस्ट : मास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडुलकर यांने आज राज्यसभेत हजेरी लावली. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. आजच्या पहिल्या सत्रात सचिनने हजेरी लावत सर्व सदस्यांचं लक्ष वेधून घेतलं. खासदारकी मिळाल्यानंतर सचिनने पहिल्यांदाच राज्यसभेत हजर होता.

मागिल वर्षी एप्रिल महिन्यात सचिनला खासदारकी देण्यात आली. राज्यसभेत शपथविधी सोहळ्याच्या वेळी सचिनची ती तेवढीच उपस्थिती होती. मात्र अलीकडेच सचिनने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. त्यामुळे काहीशी उसंत मिळालेल्या सचिनने आज राज्यसभेत आवर्जून हजेरी लावली.

संसदीय कामकाज मंत्री राजीव शुक्ला यांच्यासोबत सचिन राज्यसभेत दाखल झाला. यानंतर गीतकार जावेद अख्तर यांच्या शेजारी जाऊन बसला. सत्राची सुरूवात झाल्यानंतर राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं. यावेळी सचिनने बाक वाजून त्याला प्रतिसाद दिला. मात्र दुर्गाशक्ती आणि वेगळ्या राज्याच्या मुद्यावर राज्यसभेत गोंधळ झाला.

यामुळे 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. यावेळी उपस्थित खासदारांनी सचिनची भेट घेऊन हस्तांदोलन केलं. सचिन सोबत त्याची पत्नी अंजलीही होती. ती प्रेक्षक गॅलरीत बसून होती. सचिनने नंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन हस्तांदोलन केलं आणि त्यांच्याशी चर्चा केली.

First published: August 5, 2013, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading