अखेर दिवाकर रावतेंचं निलंबन मागे

अखेर दिवाकर रावतेंचं निलंबन मागे

  • Share this:

divakar ravate02 ऑगस्ट : विधानसभेच्या सभापतींच्या दालनात असभ्य वर्तवणुकीचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेले शिवसेनेचे आमदार दिवाकर रावतेंचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलंय. संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधान परिषदेत आज प्रस्ताव मांडला. त्यानंतर रावतेंचं निलंबन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली.

मागिल आठवड्यात सिंचनाच्या प्रश्नावर सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या दालनात बैठक बोलवण्यात आली होती त्यावेळी रावतेंनी असभ्य भाषा वापरल्याचा ठपका ठेवत त्यांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलं होतं. रावतेंच्या निलंबनापाठोपाठ मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

या प्रकरणी विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर एकच हल्लाबोल केला. अखेर काल गुरूवारी प्रवीण दरेकर आणि सेनेचे आमदार ओंबराजे निंबाळकर यांचं निलंबन मागे घेण्यात आलं तर आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी रावतेंचंही निलंबन मागे घेण्यात आलंय.

First published: August 2, 2013, 8:13 PM IST

ताज्या बातम्या