मनसेचा 'चेन्नई एक्स्प्रेस' ग्रीन सिग्नल

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2013 04:18 PM IST

मनसेचा 'चेन्नई एक्स्प्रेस'  ग्रीन सिग्नल

mns on chenni express01 ऑगस्ट : 'दुनियादारी' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस'या दोन्ही सिनेमांच्या स्क्रीनिंगचा वाद अखेर मिटलाय. सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये दोन्ही सिनेमे आता एकत्र झळकणार आहे. चेन्नई एक्स्प्रेसचा दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दुनियादारी सिनेमाचे कलाकारही उपस्थित होते. सिंगल स्क्रीनवर दोनही सिनेमांसाठी वेळ ठरवून दिल्यामुळे या वादावर पडदा पडलाय.

 

दुनियादारी हा सिनेमा दर्जेदार असून तो चांगल्या प्रकारे सुरू आहे. एकूण 19 स्क्रीनवर हा सिनेमा झळकत आहे. त्यामुळे दुनियादारीचे शो रोखू नये. या प्रकरणावर आमची यावर चर्चा झाली असून दुनियादारी सिनेमा दिसेल आणि चेन्नई एक्स्प्रेस ही दिसेल. आता हा वाद मिटला आहे अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी दिली.

 

तर मनसेच्या पुढाकारामुळे हा वाद मिटलाय आणि मराठी रसिकांनी दुनियादारीला पसंती दिलीय त्याबद्दल अभिनेता स्वनिल जोशींने आभार मानले. बुधवारी मनसेच्या चित्रपट सेनेनं शुक्रवारी रिलीज होणार्‍या 'चेन्नई एक्स्प्रेस'ला विरोध दर्शवला होता. चेन्नई एक्स्प्रेसमुळे सिंगल स्क्रीन थिएटर्सचालकांनी दुनियादारीचे शो बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात मनसेनं थिएटर्स बंद पाडण्याचा इशारा दिला होता. अखेर 48 तासात मनसेच्या 'दुनियादारी'ने घेत चेन्नई एक्स्प्रेसला हिरवा कंदिल दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2013 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...