खड्‌ड्यात 'पाडणार्‍या' सरकारला कोर्टाची नोटीस

  • Share this:

Image img_189672_mumbaihighcort_240x180.jpg29 जुलै: 'खड्‌ड्यात' गेलेल्या जनतेसाठी मुंबई हायकोर्ट धावून आलंय. मुंबई आणि परिसरातील खड्डयांची हायकोर्टाने स्वत:हून दखल घेतली आहे. यासंदर्भात हायकोर्टाने राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांबाबत रिपोर्ट देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुंबईतले खड्डे रविवार रात्रीपर्यंत बुजवण्यात येतील अशी घोषणा मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी केली होती. पण डेडलाईन उलटून गेल्यानंतरही मुंबईतल्या रस्त्यांवर खड्‌ड्यांचं साम्राज्य कायम आहे.

 

पावसाळा आला की मुंबईत खड्‌ड्यांचं साम्राज्य पसरतं. हा पावसाळाही याला अपवाद नाही. मुंबईतले खड्डे रविवार रात्रीपर्यंत बुजवण्यात येतील अशी घोषणा मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी केली होती. पण डेडलाईन उलटून गेल्यानंतरही मुंबईतल्या रस्त्यांवर खड्‌ड्यांचं साम्राज्य कायम आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खड्डेमुक्त मुंबईची घोषणा केली होती. पण ही घोषणाही खड्‌ड्यात गेल्याचं दिसून येतंय. मागिल आठवड्यात खड्‌ड्यामुळे अपघात होऊन एका महिलेला जीव गमवावा लागला होता. यानंतर मनसे,शिवसेनेनं मुंबई-पुण्यात आंदोलनं केली होती. अखेर आता कोर्टाने दखल घेत राज्यातील महापालिकांना नोटिसा बजावलीय.

First published: July 29, 2013, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading